*नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणारे परप्रांतीय आरोपीतास अटक 3 दिवस PCR **
पो स्टे. नांदुरा येथे दि 21/03/25 रोजी बेरोजगार फिर्यादी तरुण मुलगा अक्षय देवीदास सातवं वय 26 रा खुमगावं बुर्ती याने तक्रार दिली कि त्याला चांगली नोकरी लावून देतो मोठे सेलरी पेकेज देतो असे सांगून वारवार इंटरव्यू करीता कर्नाटक राज्यात बेळगावं काव्या कनसलटसी मध्ये नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून फिर्यादी कडून 5 लाख 20.000 रु उकाळलेत परंतु 3 वर्षात कोणतीही नोकरी दिली नाही त्यास उडवाउडविचि उत्तरे देण्यात आली.
फिर्यादीस त्याची फसवणूक झाल्याचे समझळेवर त्यांनी पो. स्टे. नांदुरा येथे तक्रार दिली त्यावरून नांदुरा पोलिसांनि फसवणुकीचा गुन्हा कलम 318/4 अन्वये दाखल करून बेळगावं कर्नाटक राज्यातून आरोपीतास अटक करून आणले व 3 दिवसाचा PCR मा कोर्टातून प्राप्त करून पुढील तपास पो हवा मिलिंद जवंजाल, रवी झगरे, मॉन्टी माणकर हे करीत आहेत,
नागरिकांनी खोट्या अमिषाला बळी पडू नये सत्यता पाडताळणी करावे, आपले आर्थिक नुकसान करून घेवू नये असे आवाहांन नांदुरा पोलिस स्टेशन चे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री विलास पाटील यांनी केले.

Post a Comment
0 Comments