नवीन कायद्यांबाबत नागरी वसाहती मधे जनजागृती विषयक कार्यशाळा.
( नांदुरा पोलीसांचा उपक्रम )
नांदुरा. सर्व सामान्यांना नवीन कायद्यांचे पुरेशे ज्ञान असावे या उदात्त हेतूने ठाणेदार विलास पाटील यांनी शाळा, काॅलेज यांच्या सह नागरी वसाहतीत कायदेविषयक कार्यशाळा घेण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमा अंतर्गत मंगळवारी ४ मार्च रोजी ठाणेदार विलास पाटील यांनी शहरातील अर्बन बँक काॅलनी येथे कार्यशाळा घेवुन उपस्थीतांना नवीन कायद्या बाबत मार्गदर्शन केले.
नवीन कायद्या बाबत मार्गदर्शन करताना विलास पाटील यांनी BSN भारतीय न्याय संहीता , BNSS भारतीय नागरिक संरक्षण संहीता व BSA - 2023 या नवीन न्यायसंहीतेची माहिती नागरिकांना थोडक्यात करून दिली. १ जुलै २०२४ पासून देशात सर्वत्र लागु झालेल्या या कायद्या बाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. संकटात सापडल्यास ११२ या क्रमांकावर संपर्क करुन पोलीसांची मदत घ्यावी . तसेच पोलिस संरक्षणासाठी अतीशय महत्त्वाचे नंबर म्हणून १००
११२ , १०९१( फक्त महीलांसाठी) १०१ हा क्रमांक अग्निशमन सेवेसाठी व १०८ हा क्रमांक ॲम्ब्युलन्स साठी डायल करून तातडीने मदत मीळवावी अशी माहिती त्यांनी दिली. चोरीच्या घटना टाळण्यासाठी पोलीसांवर विसंबून न राहता काॅलनीतील नागरीकांनी गत सहा महीन्यापासुन खाजगी चौकीदार ठेवुन आपल्या घरांची सुरक्षा आपणच करायची असा उपक्रम सुरू केला असून या उपक्रमाचे ठाणेदार विलास पाटील यांनी कौतुक करीत अभिनंदन केले आहे.

Post a Comment
0 Comments