पोलीस स्टेशन नांदुरा
आज दिनांक 25/03/2025 रोजी 12.15 वा ते 12.50वा पावेतो पोलीस स्टेशन नांदुरा येथे नांदुरा शहरातील मज्जिद ट्रस्टी मौलवी यांची मीटिंग घेण्यात आली. मीटिंगमध्ये नागपूर येथे झालेल्या घटनेच्या संदर्भाणे योग्य त्या सूचना दिल्या. सोशल मीडिया फेसबुक ,व्हाट्सअप, इंस्टाग्राम याचा चुकीचा वापर करून कोणीही आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये, बाबत नमाजाच्या वेळी मज्जिद मध्ये ऐलान करावे. तसेच कोणी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास त्वरित पोलीस स्टेशन नांदुरा येथे माहिती द्यावी बाबत सूचना करण्यात आल्या. मीटिंग करता 15 मस्जिद ट्रस्टी , मौलवी हजर होते .
करिता माहिती सविनय सादर आहे.
(विलास पाटील)
पोलीस निरीक्षक
पोलीस स्टेशन नांदुरा

Post a Comment
0 Comments