Type Here to Get Search Results !

पत्रकार शेख कादिर भाई यांची ‘व्हॉइस ऑफ मीडिया उर्दू विंग’च्या बुलढाणा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड.

 वरवट बकाल.. प्रतिनिधी

पत्रकार शेख कादिर भाई यांची ‘व्हॉइस ऑफ मीडिया उर्दू विंग’च्या बुलढाणा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड.

वरवट बकाल बसस्थानक चौकात ग्रामस्थांकडून जल्लोषात सत्कार; पत्रकारिता व सामाजिक कार्यातील योगदानाचे कौतुक

पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविणारे सत्यशोधक न्यूज चॅनलचे संपादक शेख कादिर भाई यांची २ ऑक्टोबर २०२६ रोजी व्हॉइस ऑफ मीडिया उर्दू विंगच्या बुलढाणा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वरवट बकाल येथे ग्रामस्थांच्या वतीने उत्स्फूर्त सत्कार करण्यात आला.


वरवट बकाल येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबुराव गुलाबराव नांदोकार, वंचित बहुजन आघाडीचे संग्रामपूर तालुकाध्यक्ष आशिष धुंधळे, समाजसेवक शेख तोसीब जमदार तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या पुढाकारातून वरवट बकाल बसस्थानक चौकात हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी शेख कादिर भाई यांचा पुष्पहार व सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.


शेख कादिर भाई हे सत्यशोधक न्यूज चॅनलचे संपादक, दैनिक सत्यशोधक न्यूजचे संपादक, दैनिक सेवाशक्तीचे उपसंपादक तसेच ‘सच के साथ न्यूज’चे संपादक म्हणून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच राष्ट्रीय अल्पसंख्यांक पितळावर्ग संघटन, नवी दिल्लीचे विदर्भ अध्यक्ष म्हणूनही ते सामाजिक प्रश्नांसाठी कार्यरत असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.


हल्ल्यानंतरही पत्रकारितेची लढाई कायम


काही महिन्यांपूर्वी पत्रकार शेख कादिर भाई यांच्यावर झालेल्या हल्ल्याची घटनाही यावेळी चर्चेत आली. या प्रकरणाचा तपास अद्याप पूर्ण झालेला नसून, संबंधित आरोपी अद्याप फरार असल्याचे शेख कादिर भाई यांच्या म्हणण्यानुसार सांगण्यात आले. या प्रकरणात तामगाव पोलीस स्टेशनकडून तपास करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही यापूर्वी करण्यात आली आहे.


हल्ल्यानंतरही खचून न जाता पत्रकारिता आणि सामाजिक प्रश्नांवरील आपली भूमिका कायम ठेवणाऱ्या शेख कादिर भाई यांची व्हॉइस ऑफ मीडिया उर्दू विंगच्या जिल्हा उपाध्यक्षपदी झालेली निवड ही त्यांच्या कार्याची दखल असल्याची भावना उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली.


मान्यवरांसह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती


या सत्कार सोहळ्यास गुणवंत चंद्रभान रोंदळे, देवमन रामाजी रोंदळे, मोहनसिंग डाबेराव फेटेवाले, अनंता पाटील काकणवाडा, विनोद श्रीहरी कुकडे, समाधान पुंडलिक वानेरे, शेख लाला शेख रऊफ, नामदेव नारायण मेहेंगे, समाधान महादेव हागे यांच्यासह वरवट बकाल येथील ज्येष्ठ पत्रकार भाऊ भोजने, पत्रकार अमोल ठाकरे, पत्रकार साबीर साहेब, पत्रकार अशोक आकोटकर, तसेच आठवले गटाचे संग्रामपूर तालुकाध्यक्ष बाबूलाल इंगळे, सिद्धोधन इंगळे आणि विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी उपस्थितांनी शेख कादिर भाई यांचे अभिनंदन करत पत्रकारितेच्या माध्यमातून सामान्य नागरिक, शेतकरी, वंचित आणि दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची भूमिका अधिक प्रभावी ठरो, अशा शुभेच्छा दिल्या.


वरवट बकालच्या बसस्थानक चौकात झालेल्या या सत्कार सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे

Post a Comment

0 Comments