गणपती, कांवड व ईद-ए-मिलादच्या बंदोबस्ताबद्दल वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील यांचा मोठया आनंदाने सत्कार करण्यात आला.
अकोला .गणपती उत्सव तसेच ईद-ए-मिलाद-उन-नबी या दोन्ही धार्मिक उत्सवांच्या काळात शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवत उत्कृष्ट बंदोबस्त बजावल्याबद्दल वाहतूक पोलिसांचा सत्कार करण्यात आला.
गणपती व ईद-ए-मिलादच्या उत्कृष्ट बंदोबस्ताबद्दल पोलीस निरीक्षक विलास पाटील यांचा सत्कार
अकोला : गणपती उत्सव तसेच ईद-ए-मिलाद-उन-नबी या धार्मिक उत्सवांच्या काळात शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी उत्कृष्ट नियोजन व बंदोबस्त केल्याबद्दल अकोला वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील साहेब यांचा सत्कार करण्यात आला.
पुरोगामी पत्रकार संघ आणि पोलीस मित्र समिती यांच्या वतीने पोलीस निरीक्षक विलास पाटील यांना प्रशस्तीपत्रक व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. उत्सव काळात मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असतानाही वाहतूक कोंडी टाळणे, नागरिकांना सुरक्षितपणे ये-जा करता यावी यासाठी योग्य नियोजन करणे आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याचे काम वाहतूक शाखेने प्रभावीपणे केले.
गणपती व ईद-ए-मिलादसारख्या विविध धार्मिक उत्सवांमध्ये शांतता, शिस्त आणि सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी पोलिसांनी बजावलेल्या जबाबदारीबद्दल यावेळी कौतुक करण्यात आले.
पोलीस प्रशासनाच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याच्या उद्देशाने हा सत्कार करण्यात आला. 💐💐
पुरोगामी पत्रकार संघ आणि पोलीस मित्र समिती यांच्या वतीने वाहतूक पोलिसांचा प्रशस्तीपत्रक, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. उत्सव काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये, वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी वाहतूक पोलिसांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचे यावेळी कौतुक करण्यात आले.
गणपती व ईद-ए-मिलाद यांसारख्या विविध समाजांच्या धार्मिक उत्सवांमध्ये पोलीस प्रशासनाने समन्वयाने आणि जबाबदारीने कर्तव्य बजावल्याबद्दल पुरोगामी पत्रकार संघ व पोलीस मित्र समितीने पोलिसांचे अभिनंदन केले.
यावेळी “उत्सव कोणताही असो, नागरिकांच्या सुरक्षिततेसह वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे,” असे मत व्यक्त करण्यात आले.

Post a Comment
0 Comments