क्षुल्लक वादातून तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; शेगावात येथील घटना
शेगाव*:सोपान पाटील
क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना शेगाव शहरातील आठवडी बाजारात २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली. या घटनेत नितीन नामदेव गायकवाड (वय ३५, रा. तीन पुतळे परिसर, शेगाव) याचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आठवडी बाजारात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या दरम्यान अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने नितीन गायकवाड यांच्यावर हल्ला करून त्यांचा जागीच खून केला. घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पसार झाला. खुनाची माहिती मिळताच शेगाव शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. शहरात या हत्येची बातमी पसरताच नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू . पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment
0 Comments