Type Here to Get Search Results !

अवधा बु. जय बजरंगबली प्राणप्रतिष्ठा व कळस स्थापना वर्षपूर्ती सोहळा संपन्न.

 अवधा बु. जय बजरंगबली प्राणप्रतिष्ठा व कळस स्थापना वर्षपूर्ती सोहळा संपन्न.

नांदुरा अवधा,... सोपान पाटील उपसंपादक मो. 7028259008


नांदुरा येथून जवळच असलेल्या अवधा बु येथे समस्त गावकरी मंडळी अवधा बु यांनी जय बजरंग बली प्राणप्रतिष्ठा व कळस स्थापना सोहळ्याचे आयोजन मागील वर्षी दिनांक ६ सप्टेंबर पासून ८ सप्टेंबर २०२४ पर्यंत आयोजन करण्यात आले होते तरी यावर्षी सुद्धा हा कार्यक्रम आयोजित केला होता.  ८ सप्टेंबर सोमवार रोजी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत कीर्तनाचा कार्यक्रम व महाप्रसाद प्राणप्रतिष्ठा सोहळा व कळस स्थापना वारी हनुमान येथील महंत कृष्णानंद भारती महाराज वारी हनुमान यांच्या हस्ते पार पडला होता. काल्याचे कीर्तन श्री. 1008वासुदेवानंद सरस्वती महाराज सान्दीपणी आश्रम निमगाव यांचे होते.ठिकाण हनुमान मंदिर अवधा बु. तालुका नांदुरा येथे संपन्न झाला तरी सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी याचा लाभ घेतला या कार्यक्रमाचा सर्व गावकरी मंडळीनी आभार मानले

Post a Comment

0 Comments