बुलढाण्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन बेमुदत संप .
: राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी एकत्रिकरण समितीच्या वतीने सुरू असलेल्या राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलनाला १५ दिवस उलटूनही तोडगा न निघाल्याने आरोग्य सेवा कोलमडली आहे. शासनाकडून केवळ मानधन कपात व कारणे दाखवा नोटीसचे पत्र जारी करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
या आंदोलनात राज्यातील तब्बल २६ हजारांहून अधिक कंत्राटी कर्मचारी सहभागी असून प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण, तपासणी, औषध वितरण, प्रसूती सेवा यावर मोठा परिणाम
झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील जिजामाता प्रेक्षागार येथे दररोज सुमारे ७५० कर्मचारी आंदोलनात सामील होत आहेत.
प्रमुख कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये १४ मार्च २०२४ चा शासन आदेश तातडीने लागू करणे, उर्वरित संवर्गांचे समायोजन, १५% मानधनवाढ, बदली धोरण, ईपीएफ विमा योजना, शैक्षणिक पात्रतेनुसार वेतन सुसूत्रीकरण, तसेच सेवेत मृत्यू किंवा दिव्यांगत्व आल्यास सानुग्रह अनुदान यांचा समावेश आहे. 'समायोजन आमचे हक्काचे आहे, ते मिळालेच पाहिजे,' अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.

Post a Comment
0 Comments