Type Here to Get Search Results !

नांदुरा शहरातील अतिक्रमण धारक घरकुल पासून वंचित; सर्वेक्षण करण्याची मागणी

 नांदुरा शहरातील अतिक्रमण धारक घरकुल पासून वंचित; सर्वेक्षण करण्याची मागणी 

नांदुरा... सोपान पाटील ...


नांदुरा शहरातील भीम नगर खैवाडी,अंबानगर, शिवराज नगर, रामनगर, सोफी बाग या भागात गेल्या साठ वर्षापासून नागरिक वास्तव्य करीत आहेत. नगरपरिषद ने ठरवून दिल्याप्रमाणे येथील सर्व रहिवाशी विविध शासकीय करांचा भरणा नियमितपणे करीत आहेत. परंतु अजून सुद्धा येथील नागरिकांना रमाई घरकुल योजना वगळता इतर कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही भारत सरकारच्या धोरणानुसार प्रत्येकाला हक्काचे घर मिळण्याचे उद्दिष्ट आहे.परंतु यापासून हे अतिक्रमण धारक पूर्णता वंचित आहेत या भागातील अतिक्रमित धारकांचे सर्वेक्षण करून त्यांना घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी आज 15 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता *अर्जुन वाकोडे, भागवत पेठकर, पुंडलिक काळे* , यांच्या पुढाकाराने नगरपरिषद ला निवेदन देण्यात आले. यावेळी लाला भाऊ इंगळे, शैलेश वाकोडे,प्रणव एकडे यांच्यासह रवि गंगतिर,प्रविण वसे,राजू गावंडे,अनंत रायपुरे,सतीश पोलाखरे,शिवा आमले,अजय बराटे, ऋषिकेश गंगातीरे,विशाल बोडखे,विजय वाकोडे, रशीद मामू, सिद्धार्थ वाकोडे,सतीश वसे,अक्षय मख,तेजराव वाकोडे,मंगेश नाईक,रमेश राजस,गणेश वसे,समाधान, वाकोडे,वैभव मिरगे,हर्षल  वाकोडे, आकाश वाकोडे,पवन वसे,अनिल इंगळे,विशाल राजनकर, मंगेश मुर्हे सागर भुस्कुटे,संतोष वसोकार,रोहित भोपडे,उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments