शेगाव पोलिसांनी दुचाकी चोराच्या अवघ्या48 तासात चोरटा पकडला.
शेगाव...... सोपान पाटील
अळसणा ता. शेगाव येथील रहिवासी दिनेश सुरुशे धंदर (वय 28) यांची दुचाकी स्टेट बँकेच्या शेगाव शाखेसमोरून अज्ञात चोरट्याने लंपास केली. शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या धाडसी चोरीने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. पीडिताने त्वरित शहर पोलीस स्टेशनला धाव घेऊन तक्रार नोंदवली.
ठाणेदारांचे स्पष्ट आदेश "गुन्हा लपणार नाही, चोरटा सापडल्याशिवाय थांबू नका!" तक्रार आल्यानंतर ठाणेदार नितीन पाटील यांनी आपल्या नेहमीच्या
कडक व तडाकेबाज शैलीत बीट जमादार पोलीस हेडकॉन्स्टेबल श्याम आघाव (बक्कल नंबर 784) व पोलीस कॉन्स्टेबल नरेश तायडे यांच्यावर तपासाची जबाबदारी सोपवली. "गुन्हा झाला म्हणजे पोलीस निष्क्रिय नाहीत, गुन्हेगार कधीच सुटणार नाही" हा ठाम निर्धार त्यांच्या मार्गदर्शनातून दिसून आला.
शोधमोहीम आणि पोलिसांची गुप्त शक्कल गुन्ह्यानंतर केवळ दोन दिवसांत पोलिसांनी गुप्त माहितीदारांचे जाळे, तांत्रिक तपासणी आणि सातत्यपूर्ण शोधमोहीम यामुळे अमूल्य धागेदोरे मिळवले. शेवटी तपासाची दिशा थेट
अमरावतीकडे वळली.
धाडसी कारवाई - अमरावतीतून चोरटा पकडला !
सहकार्य करणाऱ्या पथकाने अमरावती येथे धाड टाकून योगेश नामदेव बावणे (वय 42, रा. टाकरखेडा, ता. आर्वी, जि. वर्धा) याला चक्क रंगेहाथ पकडले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीला गेलेली दुचाकी जप्त करण्यात आली असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शहरात पोलिसांचे प्रचंड कौतुक
या विजयी कारवाईनंतर शेगाव शहरात सर्वत्र कौतुकाची लाट उसळली आहे.
"फक्त 48 तासांत दुचाकी परत मिळणे म्हणजे पोलिसांचे कसब व कर्तव्यदक्षता स्पष्ट होते" असे नागरिकांचे मत.
ठाणेदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखालील टीमने दाखवलेली तत्परता व शिस्त जनतेला दिलासा देणारी आहे.
अनेकांनी सोशल मीडियावरून शेगाव पोलिसांना सलाम ठोकला आहे.
नेतृत्वाचे बळ आणि पोलिसांची मेहनत
ठाणेदार नितीन पाटील यांचे नेतृत्व, बीट जमादार श्याम आघाव यांचे शौर्य,
पोलीस कॉन्स्टेबल नरेश तायडे यांची तत्परता, यामुळेच ही कारवाई यशस्वी झाली असून गुन्हेगारीला चाप बसला आहे. संदेश स्पष्ट आहे शेगावमध्ये कायदा मोडणाऱ्यांना पोलिसांची भीती आणि नागरिकांना दिलासा ! शेगाव पोलिसांच्या या कारवाईने पुन्हा सिद्ध केले की "गुन्हेगार कितीही शक्कल लढो, शेगाव पोलिसांच्या कर्तबगार पथकाच्या पुढे त्याला पळ काढणे अशक्यच आहे."

Post a Comment
0 Comments