Type Here to Get Search Results !

तहसीलदार झोपेत! – १ सप्टेंबरला डफडे वाजवत अर्ध-नग्न आंदोलनाचा समाजवादी पार्टीचा इशारा

 तहसीलदार झोपेत! – १ सप्टेंबरला डफडे वाजवत अर्ध-नग्न आंदोलनाचा समाजवादी पार्टीचा इशारा.


नांदुरा (जि. बुलढाणा) :

"प्रशासन कुंभकर्णासारखे झोपेत आहे, भ्रष्टाचाराला पाठीशी घालते आहे आणि नागरिकांच्या तक्रारी दडपते आहे," असा थेट आरोप समाजवादी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष आझाद खा पठाण यांनी करत प्रशासनाला धडकी भरवली आहे.


पठाण यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, १ सप्टेंबर २०२५ पर्यंत जर कारवाई झाली नाही, तर समाजवादी पार्टी तहसील कार्यालयासमोर अर्ध-नग्न होऊन डफडे वाजवत आंदोलन करणार आहे. "झोपेत असलेल्या तहसीलदारांना आम्ही झोपेतून उठवणारच!" असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.


📌 गंभीर गैरव्यवहार


शासन रेशन धान्याचा अपहार करून काळाबाजारात विक्री


माहिती अधिकार कायदा 2005 चे उघड उल्लंघन


inward-outward रजिस्टरमध्ये नोंदी टाळून तक्रारी दडपणे


दप्तर दिरंगाई नियमावली व नागरी सेवा नियमांचा भंग



कारवाईची मागणी

१६ व ३० जून रोजी दाखल झालेल्या तक्रारींवर तसेच ११ ऑगस्ट रोजी दिलेल्या निवेदनावरही जिल्हाधिकारी कार्यालयाने आजपर्यंत मौन बाळगले आहे. त्यामुळे नागरिकांचा विश्वास डळमळीत झाला असून, दोषींवर तातडीने फौजदारी कारवाईची मागणी पठाण यांनी केली आहे.

 प्रशासनाला अंतिम इशारा

"७ दिवसांत चौकशी सुरू करून अहवाल द्या, अन्यथा नाईलाजास्तव आम्ही रस्त्यावर उतरू. आणि एकदा रस्त्यावर उतरलो की प्रशासनाला झोप उडवूनच सोडू," असे पठाण यांनी ठामपणे सांगितले.


📌 जबाबदारी प्रशासनावरच

या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडली, तर त्याची संपूर्ण जबाबदारी नांदुरा तहसील कार्यालय व संबंधित विभागांची असेल, अशी स्पष्ट नोंदही समाजवादी पार्टीने करून दिली आहे.

Post a Comment

0 Comments