नांदुरा येथील शाहीन कॉलोनी मध्ये 41 तलवारी व 1 आरोपी अटकेत..... तालुक्यातील सर्वात मोठी कारवाई.
पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे यांची माहिती...
श्री. श्रेणिक लोढा (भा.पो.से.) अपर पोलीस अधिक्षक खामगांव तसेच अपोअ कार्यालयातील अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली संयुक्त कारवाई। आज दिनांक 20.08.2025 रोजी श्री. श्रेणिक लोढा (भा.पो.से.) अपर पोलीस अधिक्षक खामगांव यांना मिळालेल्या माहीती वरुन श्री. श्रेणिक लोढा (भा.पो.से.) अपर पोलीस अधिक्षक खामगांव स्वःत तसेच अपर पोलीस अधिक्षक कार्यालय खामगांव येथील सपोनि सचिन पाटील, पोकॉ शिवशंकर वायाळ बनं 2236 त्याच प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा येथील पोलीस अधिकारी पोउपनि अविनाश जायभाये, पोहेकॉ/478 चाँद शेख, पोहेकॉ/2018 गणेश पाटील, पोकॉ/1163 सर्व नेमणुक स्थागुशा बुलढाणा यांनी नांदुरा येथील शेख वसीम शेख सलीम रा. शाहीण कॉलणी नांदुरा याने त्याचे शाहीण कॉलणी, नांदुरा येथील राहते घरुन अवैध रित्या धारदार तलवारी विक्री करण्यासाठी मोटार सायकल वर घेवुन जाणार अशा माहीतीवरुन श्री. श्रेणीक लोढा ( भापोसे) तसेच वर नमुद सर्व पोलीस स्टाफ यांनी शाहीण कॉलणी येथे जावुन खबरे प्रमाणे शेख वसीम शेख सलीम याचे घराचे बाहेर जावुन उभे राहुन पाहीले असता आरोपी शेख वसीम शेख सलीम हा त्याची पल्सर मोटार सायकल क्रमांक एम.एच 28 बि.एन 2277 वर एक पांढऱ्या रंगाच्या पोतडीचा लांब गठठा गाडीवर ठेवुन बसण्याचे तयारीमध्ये दिसला त्याची पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच पंचानी खात्री करुन त्याचे घराचे लोखंडी गेटच्या आतमध्ये जावुन सदर व्यक्तीस परीचय देवुन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव शेख वसीम शेख सलीम वय 33 वर्ष रा. शाहीण कॉलणी नांदुरा असे सांगीतले. त्याचे ताब्यात असलेल्या पांढऱ्या गठठया मध्ये काय आहे असे विचारले तर त्यामध्ये लाल मयान असलेल्या एकुण 41 तलवारी ज्यावर सिरोही की सुप्रसिध्द तलवार 100 साल वारंटी असे दोन्ही बाजुने कोरलेल्या तलवारींची मुठीसह एकुण लांबी 82 सें.मी, पात्याची लांबी 70 सेंमी व मुठीची लांबी 12 सेंमी व पात्याची मधोमध रुंदी 4 सेंमी अशा एकुण 41 नग तलवारी किंमती 82,000/- रुपयाच्या मिळुन आल्या. तसेच सदर आरोपी याचे ताब्यातुन एक काळ्या मिळुन आल्या. तसेच सदर आरोपी याचे ताब्यातुन एक काळया रंगाची पल्सर 125 सि.सी किंमती 80,000/- रुपये व एक व्हिओ कंपनीचा चॉकलेटी रंगाचा मोबाईल किंमती 20,000/- रुपयाचा मिळुन आल्याने जप्त केला. केलेल्या कार्यवाहीमध्ये एकुण 1,82,000/- रुपयाचा माल मिळुन आला आहे. सदर आरोपी शेख वसीम शेख सलीम वय 33 वर्ष रा. शाहीण कॉलणी नांदुरा ताब्यात आहे.
सदरची कार्यवाही श्री. निलेश तांबे पोलीस अधिक्षक, बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली श्री. श्रेणिक लोढा (भा.पो.से.) अपर पोलीस अधिक्षक खामगांव, स.पो.नि. सचिन पाटील (वाचक) व स्टाफ तसेच स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा येथील पो.नि. श्री सुनिल अंबुलकर व स्थागुशा चे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी संयुक्तरित्या केली आहे.




Post a Comment
0 Comments