Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा अवधा बु.येथे स्वातंत्र दिवस उत्सवात साजरा

जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा अवधा बु.येथे स्वातंत्र दिवस उत्सवात साजरा.




अवधा बु..... सोपान पाटील मो. 7028259008

       जि. प.मराठी प्रा. शाळा अवधा बु.येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ७ वाजता शाळेचे विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच गावातील सर्व नागरिकांनी संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढून सकाळी ७:३० वाजता ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात प्रथम छत्रपती शिवाजी महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर

मराठी जिल्हा परिषद शाळा येथे शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सौ. सरला इंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

ग्रामपंचायत सदस्य अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष, मराठा दरबार न्यूज, नारी शक्ती /क्राईम अपडेट न्यूज, उपसंपादक व लेखणी शस्र तालुका प्रतिनिधी श्री. सोपान पाटील व गावातील नागरिकांची उपस्थिती लाभली होती कर्तव्यदक्ष ग्रामपंचायत अधिकारी श्री. संजय बाजड साहेब यांनी ध्वजारोहण कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली होती.

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सौ. सरला इंगळे पोलीस पाटील मनोहर इंगळे,शाळेचे मुख्याध्यापक श्री. संजय अंभोरे सर व अंगणवाडी सेविका सौ. अर्चनाबाई इंगळे आशा सेविका सौ. रेखाबाई इंगळे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी व पालकाची ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित लाभली होती.

Post a Comment

0 Comments