महात्मा फुले हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी फोडली चार थरांची दहीहंडी.
नांदुरा-.निमगाव...... सोपान पाटील
तालुक्यातील महात्मा फुले हायस्कूल निमगाव येथे दि.१६ ऑगस्टला शालेय प्रांगणात आयोजित दहीहंडी कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी चार थरांची दहीहंडी फोडून जल्लोषात दहीहंडी उत्सव साजरा केला. दहीहंडी उत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रथम सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले त्यानंतर दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. दहीहंडी फोडल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सहभागातून बनविण्यात आलेल्या गोपाळ काल्याच्या प्रसादाचे सर्वांना वितरण करण्यात आले . मुख्याध्यापक सुभाष राठोड, प्रभारी पर्यवेशिका जयश्री भोपळे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.


Post a Comment
0 Comments