हातात कोयता घेऊन दुचाकीवर फिरणाऱ्या तरुणांवर बुलढाणा पोलिसांची कारवाई.
ही घटना ३० जुलै २०२५ रोजी सोशल मीडिया सेलच्या निदर्शनास आली. इंस्टाग्रामवर दोन तरुण हातात कोयता घेऊन दुचाकीवरून फिरताना आणि व्हिडीओ शूट करताना दिसत होते. त्यांनी तो व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला होता.
पोलीसांनी दोघांना ३१ जुलै रोजी अटक केली. आरोपींची नावे:
1. अमित सुनिल बेंडवाल (वय 23) – रा. वार्ड नं. 1, नगर परिषद मागे, बुलढाणा
2. आदित्य उर्फ शक्ती संजय देशमुख (वय 23) – रा. शिवराज नगर, शरद कॉलेज मागे, बुलढाणा
पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून धारदार लोखंडी कोयता जप्त केला आहे. त्यांच्या विरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांचे आवाहन:
सोशल मिडियाचा गैरवापर करू नका. अशा प्रकारचे व्हिडीओ व्हायरल करणे गुन्हा आहे. कोणी आक्षेपार्ह व्हिडीओ पाठवल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा. बुलढाणा पोलीस जनतेच्या सुरक्षेसाठी नेहमी सज्ज आहेत.
ही कारवाई पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


Post a Comment
0 Comments