Type Here to Get Search Results !

शेगाव व संग्रामपुर तालुक्यात शिवसेनेला मोठे बळ काँग्रेस व ठाकरे गटाला मोठा झटका.

 शेगाव व संग्रामपुर तालुक्यात शिवसेनेला मोठे बळ काँग्रेस व

ठाकरे गटाला मोठा झटका.

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत संग्रामपूर तालुक्यातील उबाठाच्या माजी  पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश


संग्रामपुर /तालुका प्रतिनिधी 

संग्रामपूर तालुक्यातील उ बा ठा चे  माजी  पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत व शिवसेना जिल्हाप्रमुख शांताराम भाऊ दाणे शिवसेना तालुकाप्रमुख केशव ढोकणे शिवसेना शहरप्रमुख संतोष लिप्ते युवा सेना तालुकाप्रमुख उमेश पाटील शेळके महिला आघाडी तालुका प्रमुख मयुरी शेजोळे यांच्या नेतृत्वात ३ जुलै रोजी शेगाव येथील विश्राम गृहात   पक्षप्रवेश केला.

 

*यावेळी ठाकरे गटाचे किसान सेनेचे माजी तालुकाप्रमुख अमोल ठाकरे व युवा सेनेचे माजी तालुकाप्रमुख शिवाजी अढाव काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष प्रफुल प्रदीप डोंगरे यांच्यासह काँग्रेसच्या व उबाठाच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या  उपस्थितीत शेगाव येथे शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे . या पक्षप्रवेशामुळे  शिवसेनेचे युवा सेनेचे हात शेगाव व संग्रामपूर तालुक्यात बळकट झाले आहेत. तर शिवसेना उबाठा ला संग्रामपूर तालुक्यात खिंडार पडली आहे.

यावेळी संग्रामपूर तालुक्यातील अमोल ठाकरे , शिवाजी अढाव, सुनील मुकुंद, गजानन वानखडे, राजेंद्र खारोडे, डॉ.भगवान गोतमारे , संतोष गोल्हर, संदेश फाटे, नितीन जळमकर,धनसिंग ठाकूर, गणेश ईगोकार, पवन घटे, जितेंद्र तायडे, पिंटू दाभाडे,राजु अवचार,हरी लिप्ते,सोहम ठाकरे,धनसिंग ठाकुर आदींनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला*.

Post a Comment

0 Comments