मित्र फाऊंडेशन नांदुरा च्या वतीने सीए परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार
:नांदुरा..... सोपान पाटील
महत्वाची व प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या सीए परीक्षेचा अंतिम निकाल ६ जुलै रोजी जाहीर करण्यात आला. या परिक्षेत फणसे ले आऊट नांदुरा शहरातील रहिवाशी असलेले फुटपाथवर पाणीपुरी, भेळ इत्यादी व्यवसाय करणारे रविंद्र द्वारकादास शर्मा यांचा मुलगा चिं जितेंद्र शर्मा हा मे २०२५ मध्ये झालेल्या सि ए च्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे,
एका सामान्य पार्श्वभूमीतून आणि मर्यादित संसाधनामधून आलेल्या जितेंद्र याने कधीही परिस्थितीला आपले नशीब ठरवू दिले नाही. रात्रंदिवस दीर्घ अभ्यासाने आणि अथक परिश्रमाने त्याने ही प्रतिष्ठित पदवी मिळवली आहे.
मित्र फाऊंडेशन नांदुरा चे सर्व सदस्य व फणसे ले आऊट मधील सर्व महिला भगिनी व पुरुषांनी जितेद्र शर्मा व त्याचे वडील श्री रवि शर्मा व मोठा भाऊ मनोज शर्मा यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार केला , याप्रसंगी जितेश शर्मा यांनी त्यांच्या खडतर कठीण प्रवासातून कसे यश संपादन केले हे सांगितले व पुढील पिढीस प्रेरणा दिली.

Post a Comment
0 Comments