RAWE अंतर्गत बचत गट महिलांशी संवाद -प्रेरणादायी अनुभवाची देवाणघेवान
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातंर्गत स्थानिय एस.व्ही.जी.आय कृषी महाविद्याव्यातील अंतीम वर्षीय ( Rawe) विद्यार्थ्यांनी 16-06-2025 रोजी गावातील बचत गट महिलांशी संवाद साधला. या कार्यक्रमाचा उद्देश ग्रामीण जीवनाशी प्रत्यक्ष अनुभूती घेणे आणि महिलांच्या स्वावलंबी प्रवासातून शिकणे हा होता. महिलांनी त्यांचे शेतीपूरक व्यवसाय, बचत गटांच्या माध्यमातून झालेला आर्थिक बदल, आणि सामाजिक सशक्तीकरणाचे अनुभव विद्यार्थ्यांना सांगीतले. बचत गटामूळे केवळ पैसे वाचवले नाहीत तर आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि एकत्र काम करण्याची सवयही लावली, असे बचत गट अध्यक्षांनी सांगितले या कार्यक्रमात उपसहायक कृषीअधिकारी श्रीकृष्ण शिंदे सर, सहायक कृषी अधिकारी गवळी मॅडम, आणि बचत गट अध्यक्ष ज्योती गजानन कोकाटे , मुक्ता रविन्द्र देवकर आणि *RAWE* ग्रुप चे सदस्य हर्ष भगत, अजय भगत, यश घुगे, मयुर तांदळे, विशाल देशमुख हे विद्यार्थी उपस्थीत होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य. योगेश गवई सर , कार्यक्रम अधिकारी अविनाश आटोळे सर, प्रमोद डव्हळे सर, विषय तज्ञ श्रीकृष्ण आमले सर यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment
0 Comments