मलकापूर पांग्रा येथे 18 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर
गुलशेर शेख
शिबिर आयोजन हे पंडित नेहरू विद्यालयाच्या प्रांगणामध्ये चा उत्साहात पार पाडले. या शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.
शिबिराचे आयोजन जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार व उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नायब तहसीलदार प्रवीण कुमार वराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराला सुरुवात झाली प्रवीण वराडे यांनी जनतेशी संवाद साधून विविध विभागाच्या समस्या मार्गी लावण्याचे आदेश दिले. महसूल विभागाकडून जिवंत सातबारा मोहीम स्मशानभूमीच्या नोंदी विविध दाखले सलोखा योजना संजय गांधी निराधार योजना कृषी विभागाअंतर्गत येणाऱ्या योजना तसेच अनेक योजनेची प्रमाणपत्र वाटप देखील करण्यात आले.
संजय गांधी निराधार योजना, आरोग्य तपासणी, आयुष्मान भारत कार्ड वाटप,पी एम किसान योजनेबद्दल मार्गदर्शन, अशा भरपूर सेवांचा लाभ नागरिकांनी घेतला.
शिबिरामध्ये महसूल, कृषी, पुरवठा, पशुसंवर्धन, आरोग्य, संजय गांधी योजना, सेतू सुविधा, अच्छा प्रमुख विभागांचे अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी मलकापूर मंडळांनी खूप मोठे परिश्रम घेतले यामध्ये
मंडळाधिकारी भाई वानखेडे, ग्राम महसूल अधिकारी पंकज देशमुख, प्रभाकर बावस्कर, प्रदीप मोगल, कृष्णा निकम, किंगरे, राठोड, मदन वायाळ, दादाराव भोसर, तसेच ठेकेदार नाथाभाऊ दराडे,मलकापूर पांगरा सरपंच यादव टाले, झोटिंग सरपंच अशोक वाघ, कुंबेफळ सरपंच राजू इंगळे,ढोरवी सरपंच नितीन पवार, पोपळ शिवनि सरपंच संतोष घाडगे, कोणाटी सरपंच खंदारे, ग्रामविकास अधिकारी किशोर जाधव, व इतर उपस्थित होते पत्रकार मंडळी मध्ये भगवान साळवे, फकिरा पठाण वसिम शेख पवन मगर, प्रल्हाद देशमुख, ज्ञानेश्वर कळकुंबे, सचिन खंदारे, गंगाराम उबाळे उपस्थित होते तसेच स्थानिक कर्मचारी अंगणवाडी कर्मचारी व ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती व लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात यश आले असे प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे

Post a Comment
0 Comments