राजश्री श्री शाहू महाराज इंग्लिश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज व रिशी विद्यालय इंग्लिश मीडियम मंठा रोड जालना येथे जनजागृती प्रबोधन अभियान घेतल्या बाबत,
जालना प्रतिनिधि ... गुलशेर शेख
आज दिनांक 26/06/2025 रोजी 08 ते 09.व 09.00 ते 10.00 वाजतो राजश्री श्री शाहू महाराज इंग्लिश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज व रिशी विद्यालय इंग्लिश मीडियम मंठा रोड जालना येथे विद्यार्थ्यांना वाहतूक नियमाचे मार्गदर्शन करून या संदर्भाने रस्ता सुरक्षा अभियान राबवण्याच्या उद्देशाने मा. प्रवीण साळुंखे सर अपर पोलीस महासंचालक (वा) म. रा मुंबई. मा.पोलीस अधीक्षक चिखले साहेब (वा) मुख्यालय म. रा. मुंबई, मा. पोलीस अधीक्षक श्रीमती दरेकर मॅडम महामार्ग सुरक्षा पथक प्रादेशिक विभाग छत्रपती संभाजी नगर, मा. पोलीस उप अधीक्षक श्री डीसले साहेब महामार्ग सुरक्षा पथक प्रादेशिक विभाग छत्रपती संभाजी नगर ,पोलीस निरीक्षक श्री चौधरी साहेब महामार्ग सुरक्षा पथक परिक्षेत्र छत्रपती संभाजीनगर यांचे मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना व विद्यार्थी वाहतूक करणारे स्कूल बस चालक यांना तसेच विद्यार्थी पालकासोबत प्रवास करतांना तसेच आपण स्वतः खालील वाहतूक नियमाचे पालन करण्याच्या सूचना व मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमास आम्ही प्रभारी अधिकारी आर .के.निकम पोलीस उपनिरीक्षक सोबत ASI शिवाजी साळुंखे HC/194 मिसाळ . राजश्री श्री शाहू महाराज इंग्लिश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज व रिशी विद्यालय इंग्लिश मीडियम मंठा रोड जालना येथे विद्यार्थ्यांना वाहतूक नियमाचे मार्गदर्शन खालील प्रमाणे केले
1) आपण 18 वर्षाची होईपावेतो तसेच लायसन असल्याशिवाय वाहन चालवू नये.
2) रोड ओलांडताना आधी उजव्या बाजूला बघावे त्यानंतर डाव्या बाजूला बघावे व रोड पार करावा.
3) मोटर सायकलवर दोन सीटचाच वापर करावा.
4) मोटर सायकलवर प्रवास करतांना हेल्मेटचा वापर करावा.
5) आतील रोड वरून मेन रोडला येतांना थोडे थांबावे दोन्ही बाजूंना बघावे नंतर वाहन अथवा आपण रोड वर यावे
6) रस्त्यावर धोकादायक रित्या भरधाव वेगाने वाहन चालू नये.
7) धोकादायक रित्या रस्त्यावर वाहन उभा करू नये,
8) चार चाकी वाहनात प्रवास करतांना सीट बेल्टचा वापर करावा.
9) महामार्गावर वाहन चालकाने वाहन चालवत असतांना मोठ मोठ्याने गाणी लावून वाहन चालवू नये.
10)वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नये.
11) वेग मर्यादाचे पालन करावे.
12)ओव्हरटेक करताना उजव्या बाजूने वाहन चालवावे.
13) वाहन चालवतांना वाहतूक चिन्हे पाहून त्या सूचना प्रमाणे वाहन चालवावे
14) वाहन चालकांने वाहन चालवितांना स्वतःची काळजी व खबरदारी तसेच स्वतःची व दुसऱ्याची हानी होणार नाही याची काळजी
तसेच रस्त्यावर एखादा अपघात झाल्यास आपण स्वतः त्यांना मदत करावी किंवा डायल 112 वर कॉल करून त्यांना मदत होईल असा प्रयत्न करावा जेणेकरून वेळेच्या जखमीला उपचार मिळाल्यास त्यांचा जीव वाचण्यास मदत होईल
तसेच सदर शाळेचे विद्यार्थी यांची ने आण करणारे स्कूल बस चालक यांना सुद्धा महत्त्वाचे मार्गदर्शन व सूचना केल्या .
सदर रस्ता सुरक्षा अभियानात सदर स्कूल मधील विद्यार्थी वाहतूक करणारे वाहनाचे चालक . शाळेच्या प्रिन्सिपल मॅडम व प्रशासक श्री आंबेकर सर व रिशी विद्यालयाचे वाईन्स प्रिन्सिपल यशवंत सर व घडसिंग सर दोन्ही विद्यालयातील 34 शिक्षक व शिक्षका व 330 विद्यार्थी ,विद्यार्थ्यांची ने आण करणारे 20 चालक हजर होते.

Post a Comment
0 Comments