Type Here to Get Search Results !

किरीट सोमय्या यांच्या बिनबुडाच्या आरोपांना समाजवादी पार्टीचा चोख प्रतिउत्तर


समाजवादी पार्टी – बुलढाणा जिल्हा

दि. २७ जून २०२५


 किरीट सोमय्या यांच्या बिनबुडाच्या आरोपांना समाजवादी पार्टीचा चोख प्रतिउत्तर 


"जनतेला भडकवायचं, मुस्लिमांना बदनाम करायचं आणि निवडणूक जवळ आली की 'रोहिंग्या' नाव पुन्हा उकरायचं – हेच भाजपचं ड्रामा धोरण!"


भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बुलढाण्यात दिलेलं वक्तव्य म्हणजे केवळ सस्ती प्रसिद्धी आणि धार्मिक विघटनाचं घृणास्पद षड्यंत्र आहे!

ज्या प्रमाणपत्रांच्या बाबतीत तपास सुरू आहे, त्यावर न्यायालयीन किंवा प्रशासकीय निर्णय येण्याआधीच 'बेकायदेशीर', 'रोहिंग्या' अशी लेबले लावणं म्हणजे भारतीय नागरिकांना थेट देशद्रोही ठरवण्याचा भाजपचा जुना अजेंडा पुन्हा पुढे आणण्याचा प्रयत्न आहे.


❌ हे आरोप म्हणजे भाजपचा "Divide and Rule" प्रकल्प!


> सवाल भाजपला –

👉 हे प्रमाणपत्र तुमच्या सरकारच्या काळातच का वाटले गेले?

👉 मग तेव्हा तुम्ही कुठं होतात?

👉 आताच 'रोहिंग्या' नाव आठवायचं कारण काय?



🔥 समाजवादी पार्टीचा इशारा:


बुलढाण्याच्या मातीत धार्मिक विष पेरण्याचा प्रयत्न केला, तर समाजवादी कार्यकर्ते रस्त्यावर उतरून जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत!

प्रशासनाने न्याय आणि संविधानाच्या चौकटीत चौकशी जरूर करावी – पण समाजात दहशत, द्वेष आणि मुस्लीम समाजाला टार्गेट करणं आम्ही कदापिही सहन करणार नाही!



 समाजवादी पक्षाच्या प्रमुख मागण्या:


1. प्रशासनाने पारदर्शक आणि राजकीय दबावाविना कारवाई करावी.



2. धार्मिक तेढ पसरवणाऱ्या वक्तव्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई व्हावी.



3. भाजपच्या नेत्यांनी झूट प्रचार थांबवावा – अन्यथा समाजवादी रस्त्यावर उतरून आवाज बंद करून दाखवेल!



समाजवादी पक्षाचा संदेश स्पष्ट आहे:

"धर्माच्या नावावर फूट पाडणाऱ्यांनो, जनतेच्या नजरेतून आधीच उतरले आहात – आता पोकळ आरोप करून तुम्हाला काही मिळणार नाही!"


✍️ आझाद पठाण

युवा जिल्हाध्यक्ष, समाजवादी पार्टी, बुलढाणा जिल्हा

📞 [8625892288]

Post a Comment

0 Comments