Type Here to Get Search Results !

तेल्हारा तालुक्यातील वान धरणात बुडालेल्या युवकाचा मृतदेह पिंजर येथील पथकाने काढला शोधून

 *तेल्हारा तालुक्यातील वान धरणात बुडालेल्या युवकाचा मृतदेह पिंजर येथील पथकाने काढला शोधुन* ...

पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांची शोध मोहीमेची परकाष्टा रात्री सुद्धा सर्च ऑपरेशन चालुच होते*...


अकोला जिल्हा प्रतिनिधी 

आशिष वानखडे 


 ..... आज ७ जुन 2025 रोजी दुपारी अकोला जिल्ह्याचे खासदार अनुपभाऊ धोत्रे, मा. आमदार प्रकाशभाऊ भारसाकडे आणी मा. उपविभागीय अधिकारी आकोट मनोज लोहारकर सर, तेल्हारा तहसीलदार समाधान सोनावणे सर यांनी दुपारी दिलेल्या माहिती वरुन तेल्हारा तालुक्यातील वारी हनुमान सागर वारी येथील धरणात तेल्हारा तालुक्यातील दानापुर येथील जितेंद्र मनमोहन राठी वय अं.30 वर्ष याची धरणावरील भिंतीवर मोटारसायकल आणी पाण्यात चप्पल तरंगत असताना दिसुन आली याच शंकेवरुन जितेंद्र राठी हा धरणात असल्याची दाट शक्यता असल्याने स्थानिक पातळीवर दोन टीम द्वारे शोध मोहीम चालुच होती कुठ बुडाल्याचे स्पाॅट लोकेशन नसल्याने शक्य झाले नाही शेवटी आज त्रीव शोध मोहीम घेण्यासाठी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे जिवरक्षक यांना माहीती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करीता पाचारण केले तेव्हाच दिपक सदाफळे यांचेसह टीम बोरमळी धरणात दोन युवक बुडाले होते या मृतदेहाची शोध मोहीम चालु होती लगेच मृतदेह शोधून बाहेर काढून 🛟🏊‍♀️ टीम आहे त्याच कंडीशन मधे जिल्हाधिकारी अजित कुंभार सर यांच्या आदेशावरून आरडीसी विजय पाटील सर यांचे मार्गदर्शनात पथक प्रमुख दिपक सदाफळे सहकारी मयुर सळेदार,शेखर केवट,अंकुश सदाफळे,विष्णु केवट,कीशोर तायडे,शिवम वानखडे,सार्थक वानखडे हे शोध व बचाव साहीत्यासह वारी हनुमान सागर धरणाकडे रवाना झाले घटनास्थळावर रात्री 8 वाजता पोहचताच सर्च ऑपरेशन चालु करण्यात आले नेमक कुठे बुडाला हे स्पाॅट लोकेशन माहीती नसल्याने तसेच धरणात कुठे 70 तर कुठ 80 फुट खोल पाणी आणी कपारी असल्याने शोध मोहीमेस अडथळे निर्माण होत होते तरीपण हे ऑपरेशन मृतदेह मिळेपर्यंत चालुच ठेवणार आहे असे आश्वासन जिवरक्षक दिपक सदाफळे यांनी नातेवाईक पोलीस प्रशासनास दिले होते शेवटी अथक प्रयत्नांनंतर आज रात्री 11:30 वाजताचे दरम्यान 80 फुट तळाशी असलेला मृतदेह रॅम्प यु कीट बॅक केले आणी मृतदेह वर आणुन काढला यावेळी घटनास्थळावर हिवरखेड पोलीस स्टेशन चे ठाणेदार गजानन राठोड सर,पो.काॅ. प्रमोद चव्हाण पो.हे.काॅ.इंगळे, आणी पोलीस कर्मचारी हजर आहेत तसेच तहसील चे मंडळ अधिकारी माळेगांव बा. ओमप्रकाश वेरुळकार, तलाठी अंकुश मानकर, दानापुर चे.पो.पा.संतोष माकोडे,आणी नातेवाईक हजर आहेत. तहसीलदार सोनावणे सर आणी जि.आ.व्य.अ.संदीप साबळे साहेब संपर्कात आहेत.अशी माहीती पथक प्रमुख दिपक सदाफळे यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments