बार्शीटाकळी/ प्रतिनिधी
आशिष वानखडे.
तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशन हद्दीतील भेंडी महाल शिवारामध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू आहे, दरम्यान, भेंडी महाल ते पिंजर रस्त्याने सौर ऊर्जा प्रकल्पाचे इलेक्ट्रिक पोल उभारले होते, पिंजर हद्दीतील उभ्या पोलवरून अज्ञात चोरट्यांनी अंदाजे वीस हजार रुपयांचा इलेक्ट्रिक ॲल्युमिनियम तार आणि चोरीच्या कामात वापरलेले वाहन बोलेरो पिकप गाडी जप्त केली आहे, पिंजर पोलिसांनी अवघ्या दोन दिवसातच तक्रार प्राप्त होताच, चोरट्यांचा शोध घेऊन तीन आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे, त्यामुळे पिंजर पोलिसांच्या कारवाईचे कौतुक केल्या जात आहे,
पोलिसांनी दिलेल्या प्राप्त माहितीनुसार, भेंडी महाल शिवारात सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू आहे, या कंपनीने भेंडी महाल ते पिंजर पर्यंत इलेक्ट्रिक पोल उभारून त्यावर इलेक्ट्रिक तार जोडले होते, चोरट्यांनी ही संधी पाहून चार किलोमीटर अंतराचे ॲल्युमिनियमचे इलेक्ट्रिक तार, चोरीला गेल्याची तक्रार सौर ऊर्जा प्रकल्पाचे नरसिंग सरदार सिंग ठाकूर व अंदाजे ३९ वर्ष, समन्वय अधिकारी मेघा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लिमिटेड बेंगलोर हैदराबाद, यांनी पिंजर पोलिसात तक्रार केली, तक्रारीच्या आधारे पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे आणि त्यांच्या सर्व टीमने या प्रकरणाचा गांभीर्याने दोनच दिवसात छडा लावला, यामध्ये सागर गणेशसिंग सूर्यवंशी वय वर्षे 19, प्रणव महेश पटेल वय 19 वर्ष, आणि अमर राजू अनारसे वय वर्ष 22 सर्व राहणार दोनद बुद्रुक तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला या तिन्ही चोरट्याकडून चार किलोमीटर अंतरावरील ॲल्युमिनियम इलेक्ट्रिक तार अंदाजे किंमत वीस हजार रुपये,आणि गुन्ह्यामध्ये वापरलेली बोलेरो पिकअप, अंदाजे किंमत, चार लाख रुपये, आणि दोन कटर अंदाजे किंमत पाचशे रुपये, असा एकूण चार लाख पाचशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल पिंजर पोलिसांनी जप्त केला आहे, आणि या तिन्ही आरोपी विरुद्ध विविध गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे, ही कारवाई पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून हेडकॉन्स्टेबल सुभाष उघडे, हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत गोरे, पोलीस कॉन्स्टेबल नरहरी देवकते, रोशन पवार, कुणाल डोंगरे, इत्यादींनी केली आहे, दोनच दिवसात पिंजर पोलिसांनी या चोरीचा छडा लावल्याबद्दल पिंजर पोलिसांचे कौतुक केल्या जात आहे,


Post a Comment
0 Comments