अकोला प्रतिनिधी.आशिष वानखडे
कुरनखेडजवळ भीषण अपघात : एकाचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी
कुरनखेड : सोमवारी दुपारी सुमारे ४ वाजता कुरनखेडजवळ दोन वाहनांमध्ये आमने-सामने झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.
अपघात इतका जोरदार होता की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेनंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. यावेळी जवळच असलेले नागरिक मदतीस धावले. जखमी व्यक्तीला तातडीने अकोला येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय नाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तत्काळ जखमी व्यक्तीला मदत करून त्याला उपचारासाठी अकोला येथे रवाना केले. त्यांच्या या तत्परतेमुळे जखमीला तातडीने वैद्यकीय मदत मिळाली.या अपघाताबाबत अधिक तपास स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे.


Post a Comment
0 Comments