नांदुरा प्रतिनिधि - आझाद पठान
नांदुरा – दिनांक 20 जून 2025
महावितरणच्या दडपशाहीविरोधात समाजवादी पार्टीचा संतप्त आवाज! – अधिकाऱ्यांच्या उद्धट वर्तनावर आझाद पठाण यांचा रोष, तीव्र आंदोलनाची चेतावणी
नांदुरा शहरातील गैबी नगर, शांतिनगर, हेलगे नगर व अन्य परिसरात महावितरण विभागाकडून कोणतीही पूर्वसूचना अथवा नागरिकांची संमती न घेता जबरदस्तीने TOD स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रकार सुरु आहे. या बेकायदेशीर व अन्यायकारक मोहिमेचा समाजवादी पार्टी नांदुरा शहर शाखेच्या वतीने युवा जिल्हाध्यक्ष श्री. आझाद पठाण यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
या वेळी आझाद पठाण यांनी महावितरण कार्यालयासमोर आक्रमक पवित्रा घेत, नागरिकांच्या भावना अत्यंत थेट शब्दांत मांडल्या. विशेषतः महावितरणचे सहायक अभियंता श्री. मनीष जयस्वाल यांनी नागरिकांना उद्देशून केलेल्या उद्धट विधानाचा – “ही आमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, आम्ही काय बी करू शकतो” – याचा जोरदार समाचार घेत, आझाद पठाण यांनी जाहीरपणे विचारले:
> “महावितरण ही जयस्वाल साहेबांच्या बापाची जागीर आहे काय? त्यांच्या बापाने ती खासगीखाली दिली आहे काय?”
ही प्रतिक्रिया ऐकून नागरिकांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला, आणि उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला.
या दडपशाही कारवाईविरोधात समाजवादी पक्षाने पुढील मागण्या स्पष्ट केल्या आहेत:
1. स्मार्ट मीटर लावण्याची मोहीम त्वरित थांबवावी.
2. जबरदस्तीने लावलेले मीटर काढून पारंपरिक मीटर बसवावेत
3. ग्राहकांची परवानगी घेणे बंधनकारक करावे.
4. सहायक अभियंता श्री. मनीष जयस्वाल यांच्यावर त्वरित चौकशी व निलंबनाची कारवाई करावी.
5. वाढीव वीज बिलांची चौकशी करून अन्यायकारक रकमा रद्द कराव्यात.
या निवेदनप्रसंगी समाजवादी पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. उमाताई बोचरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते
जर मागण्या तात्काळ मान्य झाल्या नाहीत, तर समाजवादी पार्टी लोकशाही मार्गाने संपूर्ण शहरस्तरीय तीव्र आंदोलन छेडेल. यामध्ये होणाऱ्या कोणत्याही अनुचित घटनेची जबाबदारी महावितरण प्रशासन व जयस्वाल यांच्यावर राहील, याची शासनाने गंभीर दखल घ्यावी.
समाजवादी पार्टी
नांदुरा शहर शाखा





Post a Comment
0 Comments