Type Here to Get Search Results !

ठाणेदार श्री विलास पाटील यांनी आज पोलीस स्टेशन नांदुरा येथे खाटीक, कुरेशी, आणि मुस्लिम समाजातील लोकांची बकरी ईद निमित्त मिटिंग घेण्यात आली.

  नांदुरा प्रतिनिधी....

आज दि 3/6/25ला पोलीस स्टेशन नांदुरा येथे खाटीक, कुरेशी, आणि मुस्लिम समाजातील लोकांची बकरी ईद निमित्त मिटिंग घेण्यात आली, मिटिंग मध्ये महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 2015 ची माहिती देण्यात आली, तसेच कोणत्याच प्रकारची गैर वर्तणूक करून समाजामध्ये तेढ निर्माण होईल, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कोणतेच कृत्य करू नये तसेच इतर धार्मियांच्या भावना दुखावणार नाहीत याच्या कडे जातीने सर्वांनी लक्ष देऊन सण शांततेत पार पाडावा, समाज माध्यमावर जनावरांचे फोटो व्हिडिओ अपलोड करू नये की ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल जर असे करत असताना कोणी आढळून आल्यास त्यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याबाबत सर्वांना अवगत करण्यात आले.


याबाबत माहिती पोलीस निरीक्षक साहेब पो स्टे नांदुरा यांनी उपस्थिती असलेल्या सर्वांना दिली.

Post a Comment

0 Comments