समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या आयशर ला पाठीमागून कारची धडक एक गंभीर
बुलढाणा प्रतिनिधी. गुलशेर शेख
अपघात दिनांक : 02/06/2025 चे 01/15 वा. दरम्यान
अपघात ठिकाण ch. No. 268 नागपूर कॉरिडोर
यावेळी एपीआय संदीप इंगळे सा सोबत पोलीस आमदार उदय गीते , चंद्रशेखर उबाळे ,विकास कोळी असे रात्रगस्त पेट्रोलिंग करीत असताना छत्रपती संभाजीनगर कंट्रोल ने माहिती दिली की नागपूर कॉरिडोर चॅनल नंबर 268 वर अपघात झाला म्हणून माहिती मिळताच रवाना होऊन अपघात स्थळी पोहोचलो असता मारुती सुझुकी बलेनो कार क्रमांक एम एच 37 व्ही 96 52 चे चालक भूषण मगरे वय 35 राहणार मानका जिल्हा वाशिम हे संभाजीनगर कडून वाशिम कडे जात असताना झोपेची डुलकी लागल्याने चालकाचे कार वरील नियंत्रण सुटून सदरची कार उभ्या असलेल्या ट्रकच्या मागून धडकून अपघात घडला कारचालक गंभीर जखमी असून त्यांना तात्काळ समृद्धी महामार्ग 108 ॲम्बुलन्स चे चालक सोळंकी व डॉक्टर स्वप्निल सुसर यांनी प्राथमिक उपचार करून मेहकर उपजिल्हा रुग्णालय येथे108 ॲम्बुलन्स द्वारे रवाना करण्यात आले वाहनाचे नुकसान झाले असून, QRV टीम फरदापुर यांच्या मदतीने वाहन क्रेनच्या सहाय्याने रोडच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
म. पो . केंद्र .मलकापूर उपकेंद्र फरदापुर
समृद्धी महामार्ग जिल्हा बुलढाणा




Post a Comment
0 Comments