Type Here to Get Search Results !

आज दिनांक 2/6/2025 रोजी वंचीत बहुजन युवा आघाडी अकोट तालुक्याच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले

निलेश वानखडे . अकोट प्रतिनिधी.

 आज दिनांक ०२/०६/२०२५ रोजी वंचित बहुजन युवा आघाडी अकोट तालुक्याच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले


अकोला जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेच्या माध्यमातून हजारो लाभार्थ्यांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. मात्र, गेल्या पाच महिन्यांपासून हे मानधन त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले नाही. यामुळे लाभार्थ्यांचे जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः वृद्ध, विधवा, अपंग आणि निराधार नागरिकांसाठी हे मानधन जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी महत्त्वाचे आहे.कारण थेट लाभ हस्तांतरणामुळे लाभार्थ्यांचे मानधन रखडले आहे.

     शासनाने काही महिन्यांपूर्वी संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेचे मानधन थेट लाभहस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या प्रणालीची अंमलबजावणी होत नसल्याने लाभार्थ्यांना मानधन मिळालेले नाही.तांत्रिक अडचणींमुळे DBT प्रणाली अद्याप पूर्णतः कार्यान्वित झालेली नाही. त्यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.

     सध्या हजारो लाभार्थ्यांना घर चालवणेही कठीण झाले आहे. अनेक जण किराणा, औषधे आणि दैनंदिन गरजांसाठी इतरांवर अवलंबून आहेत. काही लाभार्थी अर्धपोटी दिवस काढत आहेत, तर काहींना भिकेची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने DBT प्रणाली कार्यान्वित होईपर्यंत जुनी ऑफलाइन पद्धत लागू करून थकीत मानधन त्वरीत द्यावे, अशी मागणी होत आहे.अकोला जिल्ह्यातील हजारो लाभार्थी संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेच्या रखडलेल्या मानधनामुळे आर्थिक शासनाने तातडीने सदर थकीत मानधन द्यावे,

      तसेच मागील वर्षी सन २०२४ खरीप हंगामातील ऑगस्ट आणि सप्टेंबर अतिवृष्टी ची मदत जाहीर झाली त्यानंतर VK नंबर मिळून सर्व शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करून अंदाजे एक महिना उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा झालेले नाही.सध्यस्थिती शेतीची मशागत तसेच पेरणीचे दिवस असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत त्याना लवकरात लवकर मदत मिळाल्यास त्याना पेरणी करण्यास सोयीचे होईल तरी शेतकऱ्यांनाही शासकीय मदत लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी.अन्यथा तीन दिवसा नंतर प्रत्येक तहसीलदार कार्यालयाला बेशरमचे तोरण बांधण्यात येतील. 

असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने देण्यात आला 

यावेळी अमन गवई ता महासचिव, निलेश झाडें वंचित बहुजन आघाडी कोषाध्यक्ष, नंदू मापरी कोषाध्यक्ष, सचिन सरकटे, आदित्य धांडे, तुषार पाचकोर, नितीन palspagar, राजपाल बडगे, दादू नितळे, प्रवीण सुरतने, सचिन सुफासे, सुहास सरकटे तसेच वंचित बहुजन आघाडी व युवा आघाडी चे पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments