जिल्हा प्रतिनिधी.आझाद पठाण
दिनांक: ०२ जून २०२५
स्थळ: तयसील कार्यालय नांदुरा, जिल्हा बुलढाणा
गौव सेवा आयोगाच्या अन्यायकारक आदेशाविरोधात समाजवादी पार्टीच्या वतीने निवेदन
गौव सेवा आयोगाच्या आदेशानुसार दिनांक ३ जून ते ६ जून २०२५ या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये येणाऱ्या गाई, बैल, वळू, बकरी आदी जनावरांची खरेदी-विक्री व वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
हा निर्णय बकरी ईद सारख्या महत्त्वाच्या धार्मिक सणाच्या पार्श्वभूमीवर दिला गेला असून, तो मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारा, आर्थिकदृष्ट्या मारक आणि एकतर्फी आहे.
या आदेशाच्या निषेधार्थ समाजवादी पार्टीच्या वतीने आज दिनांक ०२ जून २०२५ रोजी तहसीलदार साहेब, नांदुरा यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले.
हे निवेदन युवा जिल्हाध्यक्ष मा. आझाद पठाण यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले असून, या वेळी प्रमुख उपस्थितीमध्ये पुढील पदाधिकारी सहभागी होते:
उमा ताई बोचरे – महिला जिल्हाध्यक्षा, समाजवादी पार्टी
शेख नदीम, शेख अजीम, तोसीफ खान, जमीर खान, मोबीन खान, आरीफ बावा
तसेच इतर अनेक समाजवादी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते
प्रमुख मागण्या:
१. दिनांक ३ ते ६ जून दरम्यान लागू करण्यात आलेला जनावरांची खरेदी-विक्री बंदी आदेश तात्काळ मागे घ्यावा.
२. मुस्लिम समाजाच्या धार्मिक सणाच्या दिवशी कोणतीही अडथळा निर्माण होऊ नये याची खबरदारी घ्यावी.
३. शासनाने धार्मिक भावना लक्षात घेऊन निर्णय पुनर्विचारात घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात येतो.

Post a Comment
0 Comments