बुलढाणा.प्रतिनीधी -रिजवान खान
बुलढाणा प्रतिनिधी, बुलढाणा जिल्हा मुख्यालयपासून अवध्य हाकेच्या अंतरावर असलेल्या देऊळघाट येथे सर्व समाज मध्ये सलोखा असून काही अवैध व्यवसाय करणाऱ्या असमाजिक तत्त्वाकडून गावात अशांतता निर्माण केल्या जात असल्याने मौजे देऊळघाट येथील अवैध दारू विक्रेता असलेला गजानन दगडोबा पन्हाळे याचे वर कारवाई होणे करिता दिनांक २६/०५/२०२५ रोजी पासून यांनी आमरण उपोषण सुरू केले असता सदर आमरण उपोषणास दोन दिवस झाल्यानंतर बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन ठाणेदार यांनी उपोषण मंडपास भेट देऊन त्यांना ठोस आश्वासन देऊन सांगितले की गावातील संपूर्ण अवैद्य देशी दारू बंद करण्यात येईल असे सांगून सदर उपोषणकर्त्यास उपोषण सोडाव्यास लावले. मात्र काही दिवसानंतर सदर दारू विक्रेत्यांनी आपला व्यवसाय मोठ्या जोगात सुरू केलेला दिसून येत आहे.
गावातील देशी दारू विक्रेत्याविरोधात तक्रार करणारे रिजवान खान उर्फ ( राजू) यांनी अवैध देशी दारू विक्रेता करणारा गजानन पन्हाळे यांच्या सहकारी असलेल्या व्यक्तींची दारू वाहतूक करणारी गाडी क्रमांक एम एच २८ बी. डी ५०११ ही गाडी नदीवरील पुलावर थांबवली असता त्याची व्हिडिओ शूटिंग केली त्यावेळी सदर गाडीला दोन्ही बाजूंनी अवैध देशी -विदेशी दारूचे बॉक्स लावलेले होते याबाबत रिजवान खान उर्फ (राजू) यांनी पोलीस प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे त्यांनी मोबाईल वरून ८८४५०६६८१५ तसेच ९५५२४१४१८४ या पोलीस अधिकाऱ्यांना सदर घटनेची माहिती दिली असता त्याचवेळी अवैध देशी विदेशी दारू विक्रेता गजानन हा सदर ठिकाणी उपस्थित होऊन दारूची बॉटल बकस्यातून काडून तिला फोडून रिजवान खान उस्मान खान उर्फ राजू यांच्या अंगावर धावून गेला त्यावेळी उपस्थिततांनी त्याला थांबविले अन्यथा त्याचे कडून सादर दारूची फोडलेली बॉटल रिजवान खान उर्फ राजू यांचे पोटात निश्चितच बसली असती. या सर्व प्रकारानंतर बीट जमादार व त्यांचे सहकाऱ्यांनी अवैध देशी दारू विक्रेता गजानन पन्हाळे याचेवर कुठलीही कारवाई न करता उलट अवैध दारू विक्रेता विरोधात तक्रारकरते रिजवान खान उस्मान खान उर्फ राजू यांच्यावर दरोड्याची खोटा गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगितले. हा सर्व प्रकार पोलिसा समक्ष झाल्याने कोणत्याही क्षणी अवैध दारू विक्रेता गजानन पन्हाळे यांचे कडून धोका निर्माण झाला असल्याचे सामाजिक कार्यकर्ते रिजवान खान सलमान खान यांनी सांगितले आहे. सदर देशी दारू विक्रेता गजानन पन्हाळे खुले आम दारू विकत असून त्याला पोलीस प्रशासनाच्या कुठलाही धाक नसून पोलीस माझ्या खिशात आहे माझे कोणीच काही वाकडे करू शकत नाही असे तो सांगतो त्यामुळे देऊळघाट येथील कायदा व सुव्यवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली असल्याचे दिसून येत आहे



Post a Comment
0 Comments