नांदुरा पोलिसांकडून 78 दारूबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल करण्यात आला नाश
दिनांक 14/06/2025 रोजी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर यांचेकडून पोलीस स्टेशन नांदुरा येथील दारूबंदी गुन्ह्यातील 1000/-रुपये किमतीच्या आतील मुद्देमाल नाश करणे संबंधाने आदेश प्राप्त झाल्याने आज रोजी नांदुरा पोलिसांकडून सन 2024 मधील एकूण 58 दारूबंदी गुन्ह्यातील तसेच सन 2025 मधील एकूण 20 दारूबंदी गुन्ह्यातील अशा एकूण 78 दारूबंदी गुन्ह्यातील 180 एम एल च्या 50 नग शीशा तसेच 90 एम एल च्या १५५३ शीशा एकूण 1603 दारूच्या बाटल्या अशा दारूचा 1000/-रुपये किमती आतील मुद्देमाल तपासकामी कोणताही उपयोग नसल्याने पंचा समक्ष पोलीस स्टेशन आवारात रीतसर पंचनामा कारवाई करून नाश करून खाली शिष्या लिलावा करता वेगळ्या ठेवून सदर बाटल्यांचा लिलाव करून लिलावातील रक्कम सरकार जमा करण्यात येत आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील पोलीस स्टेशन नांदुरा यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे त्यांचे अधिनस्त पोलीस स्टाफ ने केली आहे.
दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या विरुद्ध पोलिसांची कारवाई
आज दिनांक 14/06/2025 रोजी सुभाष चौक नांदुरा येथे ट्राफिक अमलदार कर्तव्यावर हजर असताना एक लाल रंगाचे आयशर क्रमांक एम एच 49 ए टी 17 76 चा चालक त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने नागमोडी वळण घेत वेडे वाकडे चालवत मलकापूर कडून सुभाष चौक नांदुराकडे येत असता दिसून आल्याने त्यास पोलिसांनी सिताफिने ट्राफिकच्या मदतीने थांबवून सदर वाहन चालक नामे लक्ष्मण पुंडलिक काळे वय 48 वर्ष राहणार पिंपरी देशमुख तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा यास ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा यांच्याकडून दारू संबंधाने वैद्यकीय तपासणी केली असता तो दारूच्या अंमलाखाली असल्याबाबत अभिप्राय प्राप्त झाल्याने त्याच्याविरुद्ध सरकारतर्फे फिर्यादी होऊन भारतीय न्याय संहिता कलम 281 सह कलम 185 मोटर वाहन कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील पोलीस स्टेशन नांदुरा यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे नांदुरा पोलीस स्टेशनचे ट्राफिक अमलदार यांनी केली आहे.



Post a Comment
0 Comments