नांदुरा पोलिसांच्या छाप्यामध्ये 4.25.000 रुपयांची चोरी केलेली विद्युत तार जप्त 3 गुन्हे उघड 1 आरोपी रंगेहाथ अटक.
आज दि. 15/06/25 रोजी नांदुरा पोलिसांना गुप्त बातमीदार मार्फतीने खात्रीशीर खबर मिळाली कि डागा पेट्रोल पम्प जवळ खामगावं रोडवर शेख मुखतार शेख निसार याच्या गोडाऊन मध्ये mseb ची विद्युत वहिनीची तार ही चोरी करून आणून लपवून ठेवलेली आहे. त्या खबरे वरुन नांदुरा पोलिसांनि 2 पंच व mseb चे अभियंता शश्री जैस्वाल सर यांना सोबत घेवून छापा मारला असता त्या गोडाऊन मध्ये पोलिसांना भंगार गोडाऊन मध्ये लपवून ठेवलेली 1605 किलो आल्यूमिनियम ची विद्युत तार जिची किमत 4.25.000/ रुपये ची ही आरोपी शेख मुखतार शेख निसार याच्या जवळून जप्त केली mseb चे अधिकारी श्री जैस्वाल व गोरे सर, mseb चे इंजिनियर राठोड सर, शेख जुनेद यांनी ही ती तार ही mseb ची शासकीय तार असून निमगावं, अलमपूर शेत शिवारातील चोरीस गेलेली तार असल्याचे ओळखून सांगितल्याने सदर तार ही आरोपी कडून जप्त करण्यात आली असून त्यात आरोपी चा मुलगा शेख सोहेल शेख मुख्तर हा फरार असल्यामुळे त्याचा ही शोध नांदुरा पोलीस घेत आहेत,
सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक विलास पाटील, सहापोउप नि मिलींद जवनजाल, पो हवा भीमराव वानखेडे ,राईटर कैलास सुरडकर. संतोष मुंजाळ, DB मॉन्टी माणकर, रवी झगरे, रवी सावळे, संदीप डाबेरावं,, संदुके, गोराने, यांनी सर्वांनी मिळून आज डागा पेट्रोल पम्प येथील गोडाऊन येथे दुपारी दुपारी 2 ते 5 वाजे दरम्यान केली आहे, सदर कार्यवाही मुळे विद्युत तार चोरी करण्याच्या टोळीवर नांदुरा पोलीस PCR घेवून कायदेशीर कार्यवाही करीत असल्यामुळे विद्युत तार चोरीच्या गुन्ह्यांना मोठ्या प्रमाणात आळा बसविण्यात नांदुरा पोलिसांना यश मिळाले आहे,



Post a Comment
0 Comments