Type Here to Get Search Results !

किरीट सोमय्या, तुमच्या राजकारणाची लाज वाटावी.

 "किरीट सोमय्या, तुमच्या राजकारणाची लाज वाटावी! 

आझाद  पठाण, युवा जिल्हाध्यक्ष – समाजवादी पार्टी

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नुकतंच वक्तव्य केलं की महाराष्ट्र तीन महिन्यांत "भोंगे मुक्त" होणार आणि सर्व मशिदींवरील भोंगे उतरवले जाणार. हे विधान म्हणजे भाजपचा पारंपरिक धार्मिक तेढ निर्माण करण्याचा अजेंडा पुन्हा समोर आणण्याचा प्रयत्न आहे.


किरीट सोमय्या, महाराष्ट्र हे फक्त हिंदूंचंच राज्य नाही. इथे मुस्लिम, बौद्ध, शीख, ख्रिश्चन, सगळ्यांनी मिळून हा प्रदेश घडवला आहे. तुम्ही एकाच समुदायावर बोट ठेवून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहात. हे राजकारण नाही, हे विघटनवाद आहे!


भोंगे जर आवाजाचे कारण असेल, तर मग भोंग्यांवर बंदी ही सर्व धर्मांवर लागू व्हायला हवी. मग तुमच्या पक्षाच्या सणसमारंभांमध्ये, रॅलीमध्ये, प्रचार सभांमध्ये दणदणाट करणाऱ्या स्पीकर्सवर बंदी का नाही? की ती स्पीकर्स फक्त तुमच्या प्रचारासाठी वाजवायला मोकळी आहेत?


भाजपचे नेते म्हणजे एकच भूमिका – मुस्लीम समाजाला टार्गेट करा, मतांसाठी द्वेष पेरत राहा. पण महाराष्ट्रातील तरुण याला बळी पडणार नाहीत. आम्ही जाती-धर्माच्या पलिकडे पाहतो. आम्हाला नोकऱ्या हव्यात, शिक्षण हवंय, महागाईपासून सुटका हवीय – तुमच्या "भोंगा हटाव" नौटंकीचं राजकारण नाही!


मी, आझाद पठाण, समाजवादी पार्टीचा युवा जिल्हाध्यक्ष म्हणून स्पष्ट सांगतो – जर कोणतीही मशिदीचा भोंगा उतरवण्याचा अवास्तव प्रयत्न झाला, तर आम्ही कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने आंदोलन उभं करू. आमचं श्रद्धास्थान आणि आमचं अस्तित्व आम्ही तुमच्या मतांच्या राजकारणासाठी उध्वस्त होऊ देणार नाही.


भोंगे काढायचे असतील तर सर्व धर्मस्थळांचे काढा – अन्यथा तोंड बंद ठेवा!

Post a Comment

0 Comments