*शिवसेनेच्या संघटनेत नवी ऊर्जा – आदरणीय श्री अशोकजी टावरी (काकाजी) यांची भक्कम नेमणूक!*
महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाने आणि जनसेवेमुळे आपले विशेष स्थान निर्माण करणारे, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या दूरदृष्टीतून आणि सूचनेनुसार,शिवसेना उपनेते तसेच
शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष चे अध्यक्ष श्री अरूण भाऊ जगताप यांच्या आदेशाने, भूमिपुत्र केंद्रीय मंत्री मा.खासदार श्री प्रतापरावजी जाधव साहेब तसेच शिवसेना उपनेते एकनाथजी शेलार साहेब,उपनेते अनिल भाई पुरंदरे साहेब यांच्या उपस्थितीत शिवसेना उपजिल्हाप्रमुख आदरणीय श्री अशोकजी टावरी (काकाजी) यांची "शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष - विदर्भ संपर्क प्रमुख" या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
ही नेमणूक केवळ एका पदाची नाही, तर जनतेच्या सेवेसाठी, त्यांचा आवाज योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी आणि पक्षाच्या कार्यसंस्कृतीला बळकटी देण्यासाठी एक महत्त्वाची पावले आहे. काकाजींचा जनतेशी असलेला थेट संवाद, कार्यक्षम नेतृत्वशैली आणि कार्यकर्त्यांशी असलेले घट्ट नाते या सर्वांचा उपयोग आता संपूर्ण पूर्व विदर्भातील जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी होणार आहे.
त्यांच्या माध्यमातून ग्राहकांच्या समस्या अधिक प्रभावीपणे शासनापर्यंत पोहोचवता येतील आणि त्यांचे निराकरण लवकरात लवकर होईल, असा आमचा पूर्ण विश्वास आहे. हे पद त्यांच्यासारख्या अनुभवी, संयमी आणि संघर्षशील नेतृत्वाला मिळाल्याने शिवसेनेचा पाया अधिक भक्कम होणार आहे.
शिवसेना पक्षाची विचारसरणी आणि सेवा-कार्याच्या ध्येयधोरणांशी एकनिष्ठ राहून आदरणीय काकाजी हे सदैव सामान्य जनतेच्या हितासाठी झटत आले आहेत. त्यांच्या नेमणुकीमुळे संपूर्ण पूर्व विदर्भातील कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले आहे.
*शिवसेना पक्षात त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन!*

Post a Comment
0 Comments