**पातोंडा येथील घरफोडी च्या गुन्ह्यातील दोन आरोपीना अटक
दि, 24/01/25 रोजी नवीन पाटोडा गावीराहणारे सुधाकर एकनाथ लोणाग्रे यांच्या घरी घरफोडी झालेली होती त्यात घरातील सोने चांदी नगदी रुपये हीं चोरीस गेलेले होते. सदर गुन्ह्याचा तपास ASI जवणजाल हे करीत होते तपासात त्यांनी आरोपी 1) सिकसेन ऊर्फ मनोज मुरलीधर भोसले वय 40 रा लाखनवाडा ता खामगाव 2) गोपाल दिपू पवार वय 21 रा मालठाणा ता जळगाव जामोद ह. मु. लाखनवाडा खामगाव यांना अटक करण्यात आलेली असून त्यांनी घरफोडी चोरी करण्याची कबुली दिलेली आहे, आरोपीना यांनी जलंब, जळगावं जामोद येथे ही चोरी केल्याचे कबुली दिलेली आहे, आणखी इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे, पुढील तपास ASI जवणजाल पो, स्टे, नांदुरा DB हे करीत आहेत,

Post a Comment
0 Comments