Type Here to Get Search Results !

पोलिस अधिक्षक साहेब बुलढाणा यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली नांदुरा पोलिस स्टेशन चे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात नांदुरा बसस्थानक .रेल्वे स्टेशन चौक. येथे मॉक ड्रिल घेण्यात आली.

पोलीस स्टेशन नांदुरा


आज दिनांक 09/05/2025 रोजी 13/15 वा ते 14/30 वा दरम्यान सद्या सुरु असलेल्या आपत्कालीन युध्दजन्य परिस्थितीचे पार्श्वभुमीवर मा. पोलीस अधीक्षक साहेब बुलढाणा व मा. उपविभागीय पोलीस सा. मलकापूर यांचे मार्गदर्शनाखाली नांदुरा शहरातील नांदुरा बसस्थानक, रेल्वे स्टेशन चौक नांदुरा येथे मॉक ड्रिल घेण्यात आली. मॉक ड्रिल करीता आम्ही स्वतः पो.नि. विलास पाटील सोबत पो स्टे नांदुरा चे 02अधिकारी 13 पोलिस अंमलदार होते. सोबत ओम साई फाऊंडेशन चे विलास निंबाळकर रुग्नवाहीकासह, अग्निशामक दल व ईतर कर्मचारी उपस्थित होते. युद्धजन्य परिस्थितीत कसे नियंत्रण करावे परिस्थिती कशी हाताळावी या बाबत आम्ही पो. नि. विलास पाटील, म.पो.उप.नि. क्रांती ढाकणे, पो.उप.नि. महादेव धंदरे यांनी मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments