Type Here to Get Search Results !

ठाणेदार श्री विलास पाटील यांची जुगारावर धडाकेबाज कारवाई

आज दिनांक 19/05/2025 रोजी नांदुरा पोलिसांकडून महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत करण्यात आलेल्या कारवाई माहिती खालील प्रमाणे....

1. नांदुरा जुने बस स्थानक येथे सार्वजनिक ठिकाणी मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे मोहम्मद युसुफ शेख सईद वय 35 वर्ष राहणार पेठ मोहल्ला नांदुरा याच्या विरुद्ध जुगार कायद्यांतर्गत कारवाई करून त्याचे ताब्यातून नगदी व जुगाराचे साहित्य एकूण किमती 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच 

2. जुने बस स्थानक नांदुरा येथे सार्वजनिक ठिकाणी मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे किरण कुमार सिंघना मधे कर वय 55 वर्ष राहणार वार्ड नंबर एक नांदुरा याचे विरुद्ध जुगार कायद्यांतर्गत कारवाई करून त्याचे ताब्यातून नगदी व जुगाराचे साहित्य एकूण किमती एक हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच 

3. जुने बस स्थानक नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे फिरोज खान हबीब खान वय 40 वर्ष राहणार सायकल्पुरा नांदुरा याच्याविरुद्ध जुगार कायद्यांतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून नगदी व जुगाराचे साहित्य एकूण किमती 660 रुपयाचा मृत्युमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच 

4. महेश पान सेंटर समोर जुने बस स्थानक ची पाठीमागे सार्वजनिक ठिकाणी मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे मोहसीन खान रशीद खान व 36 वर्ष राहणार सोपीबाग नांदुरा याचे विरुद्ध जुगार कायद्याअंतर्गत कारवाई करून त्याची ताब्यातून नगदी व दुकानाचे साहित्य एकूण किमती 760 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. 

आज रोजी जुगार कायद्यांतर्गत 4 कारवाया करण्यात आलेल्या असून 3270/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

नमूद आरोपीतांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

सदरची कारवाही श्री विलास पाटील ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा यांची सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोहे का मिलिंद जवंजाळ, पो का विनायक मानकर, योगेश निंबोळकर यांनी केली आहे. 

Post a Comment

0 Comments