वायरिंग शॉट झाल्याने ट्रक जळून खाक
गुलशेर शेख.
इमर्जन्सी लाईन वर उभे असलेल्या वाहनाला मागून येणाऱ्या दुसऱ्या वाहनाची धडक
दिनांक 12/5/25 रोजी सकाळी पाच वाजता सिंदखेड राजा तालुक्यातील ग्राम पिंपळखुटा जवळ CH .NO 335.06 मुंबई कॉरीडोर
अपघात झाल्याची माहिती मिळाल्याने तात्काळ महामार्ग पोलीस चे पोलीस उपनिरीक्षक गजानन उज्जैनकर ,पोलीस कॉन्स्टेबल अमोल हरामकर व महामार्ग सुरक्षा बल चे जवान भगवान गायकवाड व स्टॉप ,तसेच सिंदखेड राजा, दुसर बीड येथील QRV टीम व 108 ॲम्बुलन्सचे चालक व डॉक्टर यांनी अपघातस्थळी पोहोचले असता ट्रेलर क्र. MH-23-AU-1477 चे चालक गणेश खारडे MH-46-CL-0087 चे चालक सुरेश ढाकणे रा.बिड हे आपली वाहने नागपूर कडून संभाजीनगर कडे मुंबई कोरडोर ने जात असताना च.नं. 335.6 वर इमर्जन्सी लाईन वर उभे असताना ट्रक क्र. CG08AS7098 चे चालक पेंदांबर ठाकूर याला झोपेची डुलकी आल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटून सदर ट्रक हा इमर्जन्सी लाईन वर उभे असलेल्या ट्रेलरला मागील बाजूने जोरात धडकला. सदर अपघातामध्ये ट्रक क्र. CG 08 AS 7098 चालक पैदंबर ठाकूर व ट्रेलरचे चालक गणेश खारडे व सुरेश ढाकणे हे गंभीर जखमी झाले त्यांना ॲम्बुलन्स च्या साह्याने जालना व सिदंखेडराजा येथे उपचार करता पाठवण्यात आले असून अपघातग्रस्त वाहने रोडच्या बाजूला उभे असून त्यांना बॅरिकेटिंग करण्यात आली आहे वाहतूक सुरळीत सुरू असून पोलीस स्टेशन सिंदखेड राजा यांना माहिती देण्यात आली आहे. व पुढील तपास करीत आहे.


Post a Comment
0 Comments