अकोला... आशीष वानखेडे
जगाला युद्ध नव्हे...तर बुद्ध हवा.
........ उद्धव कोकणे.
त्रिरत्न बुद्ध विहारात बुद्ध जयंती साजरी. शेकडो उपासक उपासिकांनी घेतला खीर दानाचा लाभ.
माना.... उद्धव कोकणे.
आज संपूर्ण जगात आरा जगता माजली असून संपूर्ण विश्वाला आपापल्या बद्दल अहंकार निर्माण झाला आहे. हा क्षणिक अहंकार हा माणसाला अधोगतीकडे मार्ग दाखवतो. आज युद्धमय स्थिती पाहता संपूर्ण जगाला "युद्ध नव्हे तर बुद्ध हवा " असे प्रतिपादन बुद्ध जयंतीदिनी उद्धव कोकणे यांनी केले.
संपूर्ण देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेमुळे मुस्लिमांचे अस्तित्व हे भारतात टिकून असून याला कारणीभूत म्हणून तथागत भगवान गौतम बुद्धांचे विचार, व शांतीचा संदेश देणारे पंचशील चे पालन करणे हेच आहे. जर देशातील सर्व नागरिकांनी पंचशील याचे तंतोतंत पालन केले. तर संपूर्ण देश हा बौद्धमय होऊन एकमेकांशी भाईचार्याने वागतील. श्री रत्न नवयुवक मंडळ व विशाखा महिला मंडळ यांनी बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून श्रीरत्न बौद्ध विहारात खीर दानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात संपूर्ण मानवाशी यांनी खीर दानाचा लाभ घेतला.
सुरुवातीला विशाखा महिला मंडळांनी त्रिरत्न बौद्ध विहारात बुद्ध वंदना घेऊन तथागत भगवान गौतम बुद्धाच्या जन्माचा पाळणा झाला. व त्यानंतर गावातील सर्व नागरिकांना त्रिरत्न नवयुवक मंडळाच्या वतीने खीर दान करण्यात आले. हे खीर दानाचा लाभ हजारो नागरिकांनी घेतला. बौद्ध विहारातील सर्व वातावरण आनंदमय झाले होते. या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून त्रिरत्न नवयुवक मंडळाचे अध्यक्ष उद्धव कोकणे, मार्गदर्शक आनंदराव कोकणे, सचिन भाऊ कोकणे, विलास कोकणे टेलर, बाबाराव जी कोकणे, नरेंद्र कोकणे, कॅप्टन बाळू कोकणे, निलेश कोकणे, धनराज कोकणे, भारत कोकणे, पवन कोकणे, अनिकेत कोकणे, अतुल इंगळे, आदित्य कोकणे, विशाल इंगळे, वैभव कोकणे, उमेश कोकणे, दिनेश कोकणे, आकाश चक्रे, निखिल चक्रे, अवि कोकणे, ग्रामपंचायत सदस्य संतोष कोकणे, किशोर इंगळे, दीपक चक्रे, दीपक कोकणे, अमोल कोकणे, स्वप्निल कोकणे, शुभम मनोहर, संजय वाघ वांजर, सिद्धार्थ वाघ वांजर, संजय कोकणे, मिलिंद आकाराम कोकणे, रोशन तेलगोटे, सुखदेवराव कोकणे, प्रज्वल कोकणे, गोंडाने, चक्रे, डोंगरे, व सर्व कोकणे परिवार तसेच विशाखा महिला मंडळाचे अध्यक्ष लता कोकणे, नंदाबाई कोकणे, माधुरी बाई कोकणे, व विशाखा महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी तसेच त्रिरत्न नवयुवक मंडळाचे सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव कोकणे यांनी करून आभार विलास कोकणे यांनी मानले.

Post a Comment
0 Comments