Type Here to Get Search Results !

नांदुरा पोलिसांची उत्कृष्ट कार्यवाही नांदुरा येथील सराईत गुन्हेगार बबलू डॉन, अजहर खान,सफदर खान हे 6 महीन्यासाठी तडीपार हद्दपार

नांदुरा. देवेंद्र जयस्वाल 

**नांदुरा मधील सराईत गुन्हेगार अझहर खान, सफदर खान @ बबलू डॉन  वय 33 वर्ष, रा, पेठ मोहोलला  नांदुरा  हा 6 महिन्या करिता तडीपार हद्दपार 

नांदुरा पोलिसांची कार्यवाही**

नांदुरा शहरातील सराईत गुन्हेगार अझहर खान ऊर्फ बबलू डॉन यास आज  उपविभागीय दडाधिकारी मलकापूर श्री संतोष शिंदे सर यांच्या आदेशन्वये  06 महिने करिता नांदुरा मलकापूर मोताळा तालुका जिल्हा बुलडाणा मधून तडीपार हद्दपार हे कलम 56 मुंबई पोलीस कायद्याअन्वये तडीपार करण्यात  आलेले आहे, 

आरोपी बबलू डॉन यांचया विरुद्ध पो स्टे. नान्दुरा येथे भरपूर गुन्हे शारिरा विरुद्ध मालमत्ते विरुद्ध, दुखापत, दंगा करणे दरोडा घालणे दहश्त निर्माण करणे यासारखे  गम्भीर गुन्हे हे दाखल  होते, आरोपीता वर वारंवार प्रतिबंधक कार्यवाही करूनही त्याच्या  वर्तुणूक मध्ये काहीएक सुधारणा होत नव्हती म्हणून नांदुरा पोलिसांनी नांदुरा तालुका जिल्हा बुलडाणा येथून तडीपार प्रस्तावं मु पो का कलम 56 प्रमाणे सादर केलेला होता त्यावर उप विभागीय दंडधिकारी  मलकापूर यांच्या आदेशनवये 06 महिने करिता बबलू डॉन यांस तडीपार करण्यात आलेले आहे

Post a Comment

0 Comments