*दानापूर येथे 33 केव्ही उपकेंद्राजवळ आग; नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला*
दानापुर/अकोला *आशिष वानखडे* (प्रतिनिधी) – येथील 33 केव्ही वीज उपकेंद्राबाहेर शुक्रवारी अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे परिसरात तात्पुरती घबराट निर्माण झाली. मात्र, स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे आग वेळीच आटोक्यात आणण्यात यश आले.
प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किट हेच या आगीचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आणि गावकरी तत्काळ घटनास्थळी पोहोचले. नागरिकांनी पाण्याच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला.
विद्युत पुरवठा काही काळासाठी खंडित करण्यात आला असून, यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. गावातील नितीन खडसान, गणेश तळोकार, गोपाल तळोकार, सुनिल बावस्कर संजय हागे, प्रफुल तळोकार अमोल दामधर , मंगेश हागे ,विनोद कतोरे व उपकेंद्र सुरक्षा रक्षक बाळकृष्ण तळोकार . सुरक्षा रक्षक अनिल बावस्कार आदींनी धाडसाने पुढे येत आग विझवण्यात मोलाची भूमिका बजावली.


Post a Comment
0 Comments