बुलढाणा जिल्ह्यातील सर्व कृ ऊ बा समित्यांमध्ये शेतकरी कन्या पुत्र अभ्यासिका सुरु करणार... मकरंद जाधव पालकमंत्री, बुलढाणा
शेतकरी कन्या पुत्र अभ्यासिकेचे प्रणेते राजेश गावंडे यांच्या प्रयत्नांना यश...
नांदुरा शहर प्रतिनिधी
शेतकरी व शेतमजूरांच्या पाल्यांच्या उज्वल भवितव्याचा शेतकरी कन्या पुत्र एमपीएस सी,यूपीएससी अभ्यासिका नांदुरा पॅटर्न बुलढाणा जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी सुरु करावा यासाठी शेतकरी कन्या पुत्र अभ्यासिकेचे प्रणेते राजेश गावंडे यांनी कॅबिनेट मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव यांना दिनांक 9 एप्रिल रोजी निवेदन दिले होते. राजेश गावंडे यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत शेतकरी कन्या पुत्र अभ्यासिकेचा नांदुरा पॅटर्न सर्व कृ ऊ बा समित्यांनी पण सुरु करावा यासाठी पालकमंत्र्यांनी ताबडतोब बुलढाणा जिल्हा उपनिबंधक यांना आदेश देऊन जिल्ह्यातील उर्वरित सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी कन्या पुत्र अभ्यासिका सुरु करण्याचे आश्वसन दिले आहे. कुठलाही आर्थिक भुर्दंड न पडनारा हा अभ्यासिकेचा उपक्रम प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू व्हावा यासाठी राजेश गावंडे हे मागील दहा वर्षापासून प्रयत्न करीत आहेत.पालकमंत्र्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे बुलढाणा जिल्ह्यातील सर्व कृ ऊ बा समित्यांमध्ये हा पॅटर्न सुरू होत असल्याने शेतकऱ्यांच्या मुलांमुलीमध्ये आनंदाचे वातावरण असून पालकमंत्र्यांच्या या निर्णयाने राजेश गावंडे यांना वाढदिवसानिमित्त आगळी वेगळी भेट दिली आहे.शेतकरी कन्या पुत्र अभ्यासिका नांदुरा येथे 2015 पासून सुरु असुन आजपर्यंत नांदुरा अभ्यासिकेमधील250 चे वर विद्यार्थी सरकारी सेवेत रुजू झाले आहेत आणि काही अंशी शेतकऱ्यांच्या आत्महत्येला सुद्धा आळा बसला आहे.
(पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातही इतर ठिकाणी अभ्यासिका सुरू करण्याचे आश्वासन दिले असून राज्यभरातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शेतकरी कन्या पुत्र अभ्यासिकेचा फायदा व्हावा म्हणून हा पॅटर्न राज्यभर व्हावा यासाठी आम्ही शासन दरबारी प्रयत्न करीत आहोत.
...... राजेश गावंडे. संस्थापक अध्यक्ष शेतकरी कन्या पुत्र एमपीएससी यूपीएससी शैक्षणिक क्रांती संघटना नांदुरा).

Post a Comment
0 Comments