Type Here to Get Search Results !

जळगांव जामोद पोलिस स्टेशन चे एपीआय माहोळ. यांच्या आशिर्वादाने सुनगांव व जामोद येथे मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा विक्री होत आहे.

 सुनगांव,जामोद येथे मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री..

जळगाव जामोद प्रतिनिधी...

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगांव व जामोद येथे मोठ्या प्रमाणात एपीआय माहोड यांच्या आशीर्वादाने अवैध गुटखा मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. अप्पर पोलीस अधीक्षक थोरात यांच्यानंतर रूजु झालेले अप्पर पोलीस अधीक्षक आयपीएस डॉक्टर श्रेणिक लोढा यांनी जळगाव जामोद तालुक्यात कारवाई करत पोलीस स्टेशन परिसरातील अवैधरीत्या सुरू असलेले सर्व अवैध धंदे बंद करण्यात आले आहेत. परंतु अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत जळगाव जामोद पोलीस स्टेशन मध्ये सहा महिन्यापूर्वी आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहोळ हे जामोद व सुनगांव इन्चार्ज असून त्यांच्या आशीर्वादाने सुनगाव व जामोदात मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याची वाहतूक व विक्री होत असून याकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन होणाऱ्या गैरप्रकारावर आळा घालण्याची मागणी काही सुज्ञ नागरिकांनी केली आहे. सुनगाव जामोद मध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याची आयात होत असते. यामध्ये सुनगाव येथील गुटखा व्यावसायिक इतरत्रही गुटख्याचा माल पुरवित आहे.हे विशेष.. तर जळगाव जामोद पोलीस हद्दीमध्ये दिनांक ४ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास गुटख्याने भरलेली एक झेन कंपनीची मारुती सुझुकी वाहन क्रमांक एम एच ०३ एएफ ५३६५ ही गाडी पकडण्यात आली. यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार अवैधरित्या गुटखा वाहतूक करणारा मूळ आरोपी देवाण-घेवाण करून सोडून देण्यात आल्याची चर्चा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सुरू आहे. तर गुटख्याची किंमत व आरोपी ची माहिती देण्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहोळ टाळाटाळ करीत असल्याने पूर्ण माहिती मिळू शकली नाही.

Post a Comment

0 Comments