Type Here to Get Search Results !

पीकविमा आणि नुकसान भरपाईसाठी संभाजी ब्रिगेडचा तहसीलदार यांना घेराव

 *पीकविमा आणि नुकसान भरपाईसाठी संभाजी ब्रिगेडचा तहसीलदार यांना घेराव*

*तातडीने शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचे तहसीलदार यांचे आश्वासन*

नांदुरा प्रतिनिधी/

गेल्या वर्षी २०२४ मधे अवकाळी पाऊस,वादळी वारा व गारा पडून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते म्हणून नुकसानभरपाई म्हणून शासनाने शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत केली असून शेतकऱ्यांना खात्यावर पैसे अदा करण्यासाठी नांदुरा तहसीलदार यांनी १७ मार्च २०२५ रोजी परीपत्रक काढत समंधीत कृषी सहाय्यक यांना हार्ड कॉपी तयार करण्याचे आदेश दिले.परंतु सदर काम हे आमचे नसून महसूल विभागाचे आहे असे सांगत कृषी सहाय्यक यांनी तहसीलदार यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी तयार करायला नकार दिला. यामुळे आज २७ मार्च रोजी संभाजी ब्रिगेड नांदुराच्या वतीने नांदुरा 

तहसीलदार साहेब यांना याबाबत निवेदन देऊन घेराव टाकला असता  शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर नुकसान भरपाईची मदत जमा करू असे आश्वासन तहसीलदार यांच्या कडून देण्यात आले.यावेळी संभाजी ब्रिगेड बुलढाणा जिल्हाध्यक्ष  अमर रमेश पाटील,जिल्हा मार्गदर्शक विनोद वनारे,नांदुरा तालुकाध्यक्ष दिलीप कोल्हे,विजय कोल्हे, भास्कर कोल्हे,शिवचरण कोल्हे सामाजिक कार्यकर्ते, विनोद कोल्हे, प्रफुल्ल बिचारे पत्रकार,शिवदास जाने, किशोर कोल्ह, महादेव कोल्हे,सागर कोल्हे, सुनिल अंभोरे, गोपाल मानकर , योगेश बाठे उपस्थित होते

Post a Comment

0 Comments