पारखेड येथे भागवत सप्ताह व यात्रा महोत्सव आनंदात पार पडला
खामगाव
- तालुक्यातील पारखेड
येथील संत श्री पहाडसिंग महाराज पुण्यतिथी निमित्त भागवत सप्ताह व यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
भागवत सप्ताह २६ मार्च पासून प्रारंभ झाला आहे. त्याची सांगता २ एप्रिल रोजी महाप्रसादाने होणार आहे. भागवत कथेचे वाचन म्हैसापूर येथील कैलास महाराज मोरे हे आपल्या अमृतवाणीतून करणार आहे. भागवत कथेची वेळ सकाळी ९ ते १२ व दुपारी ३ ते ५ अशी ठेवण्यात आली आहे. भागवत कथे बरोबरच सकाळी ५ ते ६ काकडा, सकाळी ६ ते ७ विष्णू सहस्त्रनाम, सकाळी ७ ते ८ श्री पहाडसिंग महाराज स्तोत्र पठण, संध्याकाळी ६ ते ७हरिपाठ व रात्री ८ ते १० या वेळात दररोज विविध कीर्तनकारांची कीर्तने आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये हभप विष्णु महाराज साठे, हभप ज्ञानेश्वर महाराज वाघ, हभप हरीओम महाराज शास्त्री, हभप शालिग्राम महाराज चितोडकर, हभप वासुदेव महाराज शास्त्री, हभप
पंढरीनाथ महाराज। सावतकर, हभप प्रशांत महाराज आकोते.
२ एप्रिल रोजी सकाळी १० ते १२ या वेळात भागवताचार्य केशव महाराज मोरे यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. २ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता दिंडी पताकासह पारखेड गावातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील दिंड्या पताकासह सहभागी होणार आहे. रात्री १० वाजता पासून रात्रभर कलगी तुरा भजनाची भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या भागवत कथा श्रवणाचा व धार्मिक कार्यक्रमांचा आणि महाप्रसादाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आव्हान समस्त गावकरी मंडळी पारखेड यांच्यावतीने करण्यात आले आहे.
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा 📞📞📞📞📞
तसेच संपूर्ण महाराष्ट्र भर प्रतिनिधी नियुक्ती करणे आहे.*
🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥
*मुख्य संपादक. उमाताई बोचरे मो.9822146155*
*का. संपादक. सोपान पाटील मो. 7028259008*
🟩🟩🟩🟩🟩🟩🟩🟩🟩🟩🟩🟩🟩🟩
*नारी शक्ती न्यूज व क्राईम अपडेट न्यूज पोर्टल व यु ट्यूब चॅनल*

Post a Comment
0 Comments