कुणाल कामरावर गुन्हा दाखल करा जळगाव जामोद तालुका शिवसेनेची मागणी
कॉमेडियन कुणाल कामरा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार जळगाव जामोद तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने जळगाव जामोद पोलीस स्टेशनला देण्यात आली. कॉमेडीयन कुणाल कामरा याने शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे याचे संदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी तक्रारीचे निवेदन संजय दिंगबर भुजबळ शिवसेना शहरप्रमुख जळगाव जामोद व इतर शिवसेना
पदाधिका-यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिले. दिलेल्या तक्रारी त्यांनी म्हटले कि, कॉमेडीयन कुणाल कामरा याने शिवसेना मुख्य नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संदर्भात कवितेतून खालच्या भाषेत आक्षेपार्ह विधान केले होते. तसेच हा कुणाल कामरा याने देशाच्या उच्च पदावर असणाऱ्या नेत्यांवर देखिल असे विधान यापूर्वी केलेली आहेत अश्याप्रकारे ह्या सडक्या डोक्याच्या कुणाल कामरा च्या ह्या घृणास्पद कृत्याबद्दल जळगाव जामोद शहर व तालुका
शिवसेने च्या वतीने निषेध नोंदवत त्याचेवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याचेवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. त्याचप्रमाणे यापुढे असे विधान आमचे नेतेविरूढ खपवून घेतले जाणार नाही असा इशारा निवेदन देतेवेळी देण्यात आला. तक्रार देतेवेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख देविदास घोपे, शिवसेना शहरप्रमुख, संजय भुजबळ, प्रसिद्धीप्रमुख बाळू पाटील शिमरे, शिवसेना तालुकाप्रमुख संजय धुळे, हरिभाऊ पारसकर, गजानन बाप्पू देशमुख, प्रकाश घोंगटे, शिवसेना तालुका संघटक अनंता बकाल, उपशहर प्रमुख राजेंद्रसिंग परिहार विलास दातीर, एकलव्य पाटील, युवा सेना उप तालुकाप्रमुख मंगेश टाकसाळ, विठ्ठल सिंह चव्हाण, शिवसैनिक तक्रार देतेवेळी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments