Type Here to Get Search Results !

बदली झाल्याने शिक्षक व शिक्षिकेला निरोप देताना विद्यार्थी गहिवरले, शिक्षकासही अश्रू अनावर.

 बदली झाल्याने  शिक्षक व शिक्षिकेला  निरोप देताना विद्यार्थी गहिवरले, शिक्षकासही अश्रू अनावर...... नांदुरा ( शिवाजी चिमकर ) 


मागील 7 वर्षापासून वाडी येथे कार्यरत असलेले  शिक्षक विनोद पाटील व शिक्षिका मंजूश्री महाजन 1 वर्षापासून  कार्यत होत्या यांची बदली झाल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली असून विद्यार्थी आणि शिक्षकांचे यांचे नाते घट्ट असते. विद्यार्थ्यांचा अधिक वेळ शिक्षकांच्या सहवासातच जातो. त्यामुळे शिक्षणाची गोडी निर्माण करणाऱ्या शिस्तप्रिय शिक्षक व शिक्षिका आणि विद्यार्थ्यांमध्ये एक जिव्हाळा निर्माण होतो. तालुक्यातील वाडी येथील शिक्षक विनोद पाटील व मंजूश्री महाजन ताई यांची बदली झाल्याने त्यांना निरोप देताना विद्यार्थ्यांना गहिवरून आले. तर शिक्षक व ताई यांना देखील अश्रू अनावर झाले.

 विद्यार्थ्यांसोबत त्यांचा चांगलाच लळा होता. मागील काही वर्षांपासून ते वाडी येथे कार्यरत होते. मात्र, नुकतीच त्यांची बदली   मोताळा तालुक्यात झाली तर महाजन ताई यांची कोऱ्हाळा येथे  येथे झाली आहे. विद्यार्थी नेहमी प्रमाणे शाळेत आल्यानंतर त्यांना पाटील सरांची व महाजन ताई यांची बदली झाल्याची माहिती मिळाली. आज आपल्या सरांना निरोप दिला जाणार, आपले आवडीचे शिक्षक व ताई शाळा सोडून जाणार या भावनेने विद्यार्थी अस्वस्थ झाले. शिक्षक पाटील व महाजन ताई शाळेतून निघत असताना विद्यार्थी गहिवरले. हळव्या झालेल्या विद्यार्थ्यांना समजावत अखेर शिक्षक विनोद पाटील व मंजूश्री महाजन ताई यांना निरोप दिला.या ठिकाणी शाळेचे मुख्याध्यापक विलास तांदुळकर. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवाजी चिमकर. रामेश्वर वेरूळकर शिक्षक. पुरुषोत्तम कुटे शिक्षक. प्रदीप कांबळे शिक्षक. पवार सर विद्यार्थी विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments