अवधा बु....सोपान पाटील ..
आज दि. २३/०६/२०२५ रोजी जि. प. मराठी शाळा अवधा बु येथे शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. ह्यावेळी इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसोबत गावातुन प्रवेश दिंडी काढण्यात आली. शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना पुष्प देऊन स्वागत करण्यात आले विद्यार्थ्यांना गणवेश पुस्तकांचे बुट पायमोजे वाटप करण्यात आले. इतर वर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश पाठय़पुस्तके बुट व इतर साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री संतोष रमेश इंगळे होते. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सौ सरलाताई इंगळे, व इतर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, माता पालकांची उपस्थिती होती. इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पायाचे ठसे घेऊन त्यांच्या पालकांना देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन शाळेचे मु. अ. श्री एस. डी. अंभोरे यांनी केले.


Post a Comment
0 Comments