Type Here to Get Search Results !

ठाणेदार श्री विलास पाटील यांची जुगार अड्यावर धडक कार्यवाही व तार चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला मिळाला तीन दिवस पी सी.आर

नांदुरा प्रतिनिधि- देवेंद्र जयस्वाल.

ठाणेदार श्री विलास पाटील यांच्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाने

जुगार अड्यावर धडक कार्यवाही.

आज दिनांक 17/06/2025 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरून गांधी चौक नांदुरा येथे आरोपी नामे देविदास नामदेव पुदाके वय 62 वर्ष राहणार पोळावेस नांदुरा याचे विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत कारवाई करून आरोपीचे ताब्यातून नगदी व जुगाराचे साहित्य एकूण किमती 1175/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

नमूद आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन नांदुरा येथे महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12A प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे स फौं मिलिंद जवंजाळ, पो का विनायक मानकर,पो का रवींद्र झगरे यांनी केली आहे.


 तार चोरीचे गुन्ह्यातील आरोपीला मिळाला तीन दिवस पीसीआर 

दि. 15/06/25 रोजी नांदुरा पोलिसांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान एम.एस.ई.बी चे विद्युत तार मुद्देमाल जप्ती प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी नामे शेख मुख्तार शेख निसार रा. कुरेशी नगर नांदुरा याचा मा. न्यायालयाने एकूण तीन दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेला असून आरोपी कडून सदर विद्युत तार चोरी संबंधाने विचारपूस दरम्यान गुन्ह्याचे तपासामध्ये अधिक आरोपीचे नाव निष्पन्न झाले असून लवकरच इतर सुद्धा आरोपी चा शोध घेवुन अटकेची कारवाई करण्यात येणार आहे व त्याचप्रमाणे इतर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडलेल्या विद्युत तार चोरीचे गुन्हे सुद्धा उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments