Type Here to Get Search Results !

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ अहिरे.

 नाशिक जिल्हा प्रतिनिधी.

*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे*


*चांदवड शहरातील वीज ग्राहकांचे वाढीव वीजबिल कमी करण्याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांच्या वतीने दि. २३ मे २०२५, गुरुवार रोजी महावितरण कार्यकारी अभियंता काळू माळी साहेब व अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुनिल राहींज साहेब यांना निवेदन देण्यात आले.*


नाशिक जिल्हा प्रतिनिधी 


         चांदवड शहरातील सर्व लोकांना अव्वाच्या सव्वा वाढीव  वीजबिल देण्यात आले आहेत. महावितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे जनतेला वेठीस धरले जात आहे. महावितरण कंपनीचे अधिकारी शहरातील व तालुक्यातील लोकांना मागील अनेक वर्षांपासुन अतिरिक्त वीजबिल देत आहेत. या वाढीव वीजबिलांमुळे लोक अतिशय त्रस्त झालेले आहेत. स्मार्ट मीटरला जनतेचा प्रचंड विरोध असुन देखील जनतेला न जुमानता महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लोकांवर दादागिरी व दडपशाही करत लोकांच्या घरांना स्मार्ट मीटर बसविले. या स्मार्ट मीटरचा रिडिंग स्पीड खुप जास्त आहे. स्मार्ट मीटर बसविल्यानंतर पहिल्याच महिन्यात लोकांना वाढीव वीजबिल देण्यात आले.

            नागरिकांनी वीजबिल वेळेवर न भरल्यास त्यांच्या घराची व दुकानाची वीज कट करण्यात येते व अधिकाऱ्यांकडून वीजबिल तत्काळ भरण्यासाठी धमकावण्यात येते. चांदवड शहरात व तालुक्यात अनेक गोर-गरिब, कष्टकरी व शेतकरी लोक असल्याने त्यांनी वाढीव वीजबिलासाठी कुठुन पैसे आणायचे?, असा प्रश्न या लोकांना पडलेला आहे. 'वाढीव वीजबिल न भरल्यास तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल', अशी धमकी महावितरण अधिकऱ्यांकडुन वीज ग्राहकांना देण्यात येते. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या दादागिरी व दडपशाहीमुळे लोकांना या अधिकाऱ्यांची भीती वाटु लागली आहे. अव्वा च्या सव्वा वीजबिल आल्याने लोकांची छळवणुक व पिळवणुक होत आहे.  महावितरण कंपनीकडून खुप मोठ्या प्रमाणात वाढीव वीजबिले सक्तीने वसूल केले जात आहेत. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडुन लोकांना अतिरिक्त वीजबिल देऊन वीज‌‌ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात लुटमार व भ्रष्टाचार करण्यात येत आहे. यामुळे सर्व नागरिकांमध्ये अत्यंत संतप्तेचे व तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

           लोकांना अनेकवेळा वाढीव वीजबिल येते तेव्हा ते वीजबिल कमी करण्यासाठी किंवा लाइटची कोणतीही समस्या घेऊन लोक जेव्हा महावितरण कंपनीच्या कार्यालयात जातात तेव्हा येथील अधिकारी या लोकांचे अर्जही न न बघता फेकून देतात व या लोकांना अरेरावीची भाषा वापरत लोकांना तुच्छ वागणुक देत कार्यालयातुन हाकलुन देण्यात येते. चांदवड तालुक्यात व शहरात रोजगार नसल्याने अतिरिक्त वीजबिल भरण्यासाठी जास्त पैसे जनतेने कुठून आणायचे? या चिंतेने लोक खुप त्रस्त झालेले आहेत. तसेच महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे शहरात लोडशेडिंग देखील फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. यामुळे लोकांना दिवसरात्र अंधारात रहावे लागत आहे.

          *चांदवड शहरातील व तालुक्यातील सर्व लोकांचे वाढीव वीजबिल लवकरात - लवकर कमी करण्यात यावे व उर्वरित वीज ग्राहकांच्या घरांना स्मार्ट मीटर बसविण्यात येवू नयेत. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर तीव्र स्वरुपाचे आंदोलन व आमरण उपोषण छेडण्यात येईल. यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन घडणाऱ्या परिस्थितीस प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला* व प्रत माहितीसाठी मुख्यमंत्री, चांदवड - देवळा मतदारसंघ आमदार, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरिक्षक त्यांना देण्यात आले.

       यावेळी रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments